माझे लेख

विमर्श या द्वैमासिकाच्या धगधगता शेजार या विशेषांकात प्रकाशित झालेला बांगलादेश व भारत संबंध यावरील लेख
स्वतःचीच ओळख शोधणारा देश – बांगलादेश
- मिलिंद मोहन आरोलकर
बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसिना यांच्या ‘आवामी लीग’पक्षाचा प्रचंड बहुमताने विजय झाला. त्यांच्या पक्षाला बांगलादेशच्या ‘जातीय संसद’मधील ३०० जागांपैकी २३३ जागांवर विजयी करत जनतेने कौल दिला आहे. सहयोगी पक्षांच्या जागा जोडल्या तर २६२ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवून स्थिर सरकारच्या दिशेने शेख हसिना यांचा प्रवास सुरू झाला आहे. शेख हसिना दुस-यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आहेत. त्यांची राजकीय प्रतिमा निधर्मी, शांतताप्रेमी व भारताच्या मित्र अशी राहिलेली आहे. शेख हसिना यांना जसा जनतेचा कौल मिळाला आहे तसेच बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनीही सैन्याची निष्ठा लोकनियुक्त सरकारशी आहे अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे बांगलादेशला स्थिर सरकार मिळेल असे वाटते. शेख हसिना यांनी निवडणूक जिंकल्यानंतर दहशतवादाशी दोन हात करण्याची निश्चयी प्रतिबध्दता व्यक्त केली आहे, तसेच बांगलादेशमध्ये वाढलेल्या मूलतत्ववादी इस्लामी प्रवृत्तींना पायबंद घालण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ही वक्तव्ये बांगलादेशी जनतेमध्ये नवीन आशा फुलवणा-या जशा आहेत, तशाच त्या भारताच्या हितसंबंधांच्या दृष्टीनेही फार महत्वाच्या आहेत.
बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी…
डिसेंबर १९०६ साली ढाका येथे, तत्कालीन पूर्व पाकिस्तानात ‘मुस्लीम लीग’ची स्थापना झाली. ‘धर्माधारित द्विराष्ट्र सिध्दांताचा प्रस्ताव’ प्रथम ढाका येथे मुस्लीम लीगतर्फे मांडण्यात आला. या घटनेच्या खूप नंतर २३ मार्च १९४० रोजी लाहोर अधिवेशनात मुस्लीम लीगने हाच ठराव मांडला आणि याच ठरावाच्या आधारावर हिंदुस्तानच्या फाळणीची मागणी करण्यात आली. लाहोर ठरावानंतर केवळ सात वर्षांनी १९४७ साली धर्माच्या आधारावर हिंदुस्थानची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र सार्वभौम लोकशाही राष्ट्रे निर्माण झाली. पाकिस्तानचे ‘पूर्व पाकिस्तान’ म्हणजे सध्याचा बांगलादेश आणि ‘पश्चिम पाकिस्तान’ असे दोन भाग आस्तित्वात आले. दोन सर्वस्वी भिन्न पार्श्वभूमीच्या भौगोलिक क्षेत्रांवर पाकिस्तानचे शासन अमलात आले. नवपाकिस्तान सन १९४७ पासून, राज्यघटनेने मान्य केल्याप्रमाणे एक राष्ट्र असले तरी प्रत्यक्षात मात्र दोन वेगवेगळ्या राष्ट्रांचा तो एक संच बनला होता. या राष्ट्राचे दोन भाग भौगोलिकदृष्ट्या एकमेकापासून १००० मैलांच्या होते पण सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या ते एकमेकांपासून लाखो मैल दूर होते. पाकिस्तानच्या निर्मितीमुळे मुस्लिम राष्ट्रनिर्मितीचे मुस्लिम लीग व महंमद अली जिना यांचे स्वप्न पूर्ण झाले. परंतु हिंदुस्तानापासून वेगळे होऊनही पूर्व पाकिस्तानमधील जनता जगाच्या नकाशात आपली ओळख मात्र शोधत राहिली.

मुस्लिमांची भूमी (दार-उल-इस्लाम) म्हणून पाकिस्तानचा उदय झाला. इस्लामच्या भाषेत बोलायचे झाले तर हिंदुस्तानातील लाखो मुहाजिरांनी (मुहाजिर म्हणजे इस्लाममेतर भूमीकडून इस्लामच्या भूमीमध्ये स्थलांतरित झालेले मुस्लिम) पाकिस्तानात हिजरत (इस्लाममेतर भूमीकडून इस्लामच्या भूमीमध्ये झालेले स्थलांतर) केली. पण पूर्व पाकिस्तानातील जनतेसाठी ही केवळ धूळ्फेक ठरली. आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्तरावर दोन्ही पाकिस्तानांमध्ये प्रचंड भिन्नता व विषमता होती. पाकिस्तानचे पहिले राष्ट्रप्रमुख महंमद अली जिना यांनी पाकिस्तान निर्मितीच्या पहिल्याच वर्षात १९४८ साली ढाका येथे घोषणा केली की ‘उर्दू हीच पाकिस्तानची राष्ट्रभाषा असेल’. प्रत्यक्षात उर्दू ही ‘मुजाहिरांची’ भाषा होती. पश्चिम पाकिस्तानातील सिंध भागात सिंधी, पंजाब भागात पंजाबी प्रचलित होती. तिथेही उर्दूचे प्रचलन नव्हते. शेकडो वर्षे बंगाली भाषा व साहित्याचा अभिमान बाळगणा-या पूर्व पाकिस्तानातील जनतेसाठी हा एक धक्का होता. पूर्व पाकिस्तानातील जनतेमध्ये क्षोभ उत्पन्न होऊ लागला. त्याचे बंडात रूपांतर झाले. या बंडाचे लोण संपूर्ण पूर्व पाकिस्तानात पसरले. जागोजागी विद्यार्थी व नागरिक रस्त्यावर आले. या उद्रेकांना काबूत आणण्यासाठी २१ फेब्रुवारी १९५२ या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकजण मारले गेले. ‘भाषिक हुतात्मा दिवस’या नावाने आजही या दिवसाची आठवण बांगला जनतेने ठेवली आहे. पूर्व पाकिस्तानातील बंगाली भाषेच्या प्रश्नावरून निर्माण झालेला उद्रेक हा राष्ट्रभावनेशी व पाकिस्तान निर्मितीच्या संकल्पनेशी द्रोह आहे असा समज पश्चिम पाकिस्तानातील राजकारण्यांनी करून घेतला. भाषेच्या मुद्यावरून आपले देशबांधव गमावल्यामुळे दुखावलेल्या पूर्व पाकिस्तानला दुसरा धक्का बसला तो १९७० साली आलेल्या भयावह वादळाच्या निमित्ताने. १९७० साली ‘भोला हे चक्रीवादळ पूर्व पाकिस्तानवर घोंघावू लागले. या चक्रीवादळाने ३ ते ५ लाख नागरीकांचा जीव घेतला. आलेली अस्मानी भयानक होतीच पण या आपत्तीच्या काळात पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आपले सुलतानी रूप प्रकट केले. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी जाहीर केले की या आपत्तीच्या ख-या स्वरूपाचा अंदाज न आल्यामुळे आमची गफलत झाली. यात खेद नव्हता की खंत! पूर्व पाकिस्तानला हा धक्का असह्य झाला. पूर्व पाकिस्तान मध्ये जागोजागी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचा निषेध व्यक्त होऊ लागला. जागोजागी विद्यार्थी, नागरिकांचे मोर्चे निघाले. आवामी लीग या पूर्व पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्षाने सर्व शासकीय कामांवर बंदी घातली. यानंतर सुरू झाला तो एक व्यापक जनसंघर्ष! बांगलादेश या देशाच्या मुक्तिसंग्रामाला सुरूवात झाली होती.

मुक्तिसंग्राम
पाकिस्तान निर्माण झाल्यापासून सत्ताकेंद्र पश्चिम पाकिस्तानकडेच होते. पण जनसंख्येचे प्रमाण पाहाता ते पूर्व पाकिस्तानकडे हवे होते. पश्चिम पाकिस्तानातील राज्यकर्त्यांनी हरप्रयत्नाने सत्ता आपल्याच हातात ठेवली होती. पाकिस्तानात १९७१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आवामी लीगला सर्वाधिक जागा मिळाल्या. संपूर्ण पाकिस्तानातील ३१३ जागांपैकी १६७ जागा आवामी लीगने जिंकल्या. घटनादत्त अधिकाराप्रमाणे आवामी लीग व या पक्षाचे प्रमुख शेख मुजिबूर रहमान यांना सरकार स्थापनेची संधी मिळाली. पण पश्चिम पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाच्या झुल्फिकार अली भुट्टो यांनी रहमान यांच्या पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याला तीव्र विरोध केला. उलट त्यांनी पूर्व व पश्चिम पाकिस्तान येथे दोन स्वतंत्र पंतप्रधान असावे असा प्रस्ताव मांडला. यानंतरच्या काळातील घटनांनी पूर्व पाकिस्तानचा, भारताचा, पाकिस्तानचा व त्यासोबत दक्षिण आशियाचा इतिहास संपूर्णपणे बदलला. शेख मुजिबूर रहमान यांनी आपल्या देशबांधवांना आवाहन केले. त्यांनी पूर्व पाकिस्तानातील जनउद्रेकाला दिशा दिली पाकिस्तानच्या मनमानी धोरणांविरूध्द लढा देण्याची! बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाची!
२५ मार्च १९७१ रोजी शेख मुजिब यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जाहीर केला. हा जाहीरनामा पुढीलप्रमाणे-
‘’Today Bangladesh is a sovereign and independent country. On Thursday night, West Pakistani armed forces suddenly attacked the police barracks at Razarbagh and the EPR headquarters at Pilkhana in Dhaka. Many innocent and unarmed have been killed in Dhaka city and other places of Bangladesh. Violent clashes between E.P.R. and Police on the one hand and the armed forces of Pakistan on the other, are going on. The Bengalis are fighting the enemy with great courage for an independent Bangladesh. May Allah aid us in our fight for freedom. Joy Bangla’’.
हा जाहीरनामा जगभर प्रसारित झाला. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली बंगबंधू शेख मुजिबूर यांना तुरुंगात डांबण्यात आले. पाकिस्तानी लष्कराने जागोजागी नागरिकांचे उद्रेक मोडून काढायला सुरूवात केली. सर्वसामान्य नागरिकांवर लष्करी दडपशाही सुरू झाल्यावर जनतेने तीव्र प्रतिकार करण्यास वाट शोधली मुक्ति वाहिनीची. विद्यार्थ्यांचे गट, तरूण, लष्करी अधिकारी यांचा समावेश मुक्ति वाहिनीत होता. येऊ घातलेल्या बांगलादेशची ही छुपी सशस्त्र मुक्तिफौज होती.
बांगलादेश निर्मितीत भारताचा सहभाग
जुलै १९७१ मध्ये भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानाचा उल्लेख ‘बांगलादेश’ आणि बांगलादेश मुक्ति संग्रामाला उघड पाठिंबा जाहीर केला. मुक्ति वाहिनीला शस्त्रास्त्रे भारतकडून पुरविली जाऊ लागली. चिडलेल्या पाकिस्तानी सैन्याने भारतीय फौजांवर काही ठिकाणी आक्रमक हल्ले केले. त्याला उत्तर म्हणून प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरूध्द युध्दाची घोषणा केली. मुक्ति वाहिनीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात केलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय फौजांचा झंझावात झेपला नाही. अखेर १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्यापुढे पाकिस्तानी सैन्याने गुढघे टेकले. पाकिस्तानी सैन्याचे ले. जन. ए. ए. के. नियाझी यांच्या नेतृत्वाखाली लढणा-या ९०००० पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय मोहिमेचे प्रमुख ले. जन. जगजितसिंह अरोरा यांच्यापुढे शरणागती पत्करली. जगाच्या लष्करी इतिहासातील ही एक ऎतिहसिक घटना मानली जाते. बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र बनला.
बांगलादेशच्या स्थापनेसाठी अडीच लाख भारतीय सैनिक लढले. त्यापैकी २०००० हुतात्मे झाले. २० दशलक्ष शरणार्थींना भारतात शरण मिळाली. भूतान व भारत या दोन राष्ट्रांनी सर्वप्रथम बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. शेख मुजिबूर रहमान यांनी बांगलादेशचे पहिले पंतप्रधान या नात्याने पहिला परराष्ट्र दौरा भारताचा केला. या भेटीमध्ये भारत व बांगलादेश यांचे संबंध हे लोकशाही, साम्यवाद, अलिप्तता धोरण व वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध या तत्वांच्या आधारे पुढे जातील असे निश्चित झाले. १९७२ मध्ये दोन्ही देशांनी मैत्री व शांततेचा तहावर सह्या केल्या. याचवेळी भारत बांगालादेश व्यापारसंबंधी ठराव पारित करण्यात आला.
निधर्मी तत्वांचा स्वीकार
१० एप्रिल १९७१ रोजी बांगलादेशची घोषणा एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून करण्यात आली. शेख मुजिबूर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशचे पहिले पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली ‘आमार शोनार बांगला’हे गुरूवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीताला बांगलादेशचे राष्ट्रगीत म्हणून मान मिळाला. बांगलादेशच्या संसदेने ४ नोव्हेंबर १९७२ रोजी बांगलादेशचे संविधान स्वीकृत केले. हे संविधान १६ डिसेंबर १९७२ पासून अमलात आले. संविधानातील कलम १२ द्वारे निधर्मी तत्वांचा स्वीकार बांगलादेशी जनतेने केला. हे कलम असे आहे
“निधर्मी तत्वांचा स्वीकार केल्यामुळे पुढील गोष्टींचे आस्तित्व संपुष्टात यावे-
• सर्व स्वरूपातील धार्मिकता/जातीयता
• धर्माची राजकारभारातील मान्यता
• धर्माचा राजकारणासाठी वापर
• धर्माधारित वागणूक
कट्टर इस्लाम की निधर्मी तत्वे…?
निधर्मी तत्वांच्या आधाराने बांगलादेशने सुरूवात केली खरी पण त्या देशात मूळ धरून बसलेल्या धार्मिक प्रवृत्ती गप्प बसल्या नव्हत्या. बांगलादेशी जनता पाकिस्तान विरूध्द लढताना मुस्लीम लीग, जमाते इस्लामी, निजाम-ए-इस्लाम या संघटना पाकिस्तानच्या बाजूने लढत होत्या. दुखावालेल्या पाकिस्तानने या संघटनांना हाताशी धरून डाव टाकायला सुरूवात केली. निधर्मी तत्वांचा देशाने केलेला स्वीकार आणि आवामी लीग सरकारचे भारताशी असलेले अति मित्रत्वाचे संबंध या गोष्टी बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहेत असा प्रचार त्यांनी सुरू केला. निधर्मी तत्वे ही इस्लामविरोधी आणि भारत केंद्रीत आहेत अशी त्यांची धारणा होती. इस्लामिक राष्ट्रांनी अजून बांगलादेशला मान्यता दिली नव्हती. जमात-ए-इस्लामी तर्फे इस्लामी धार्मिक कार्यक्रमांद्वारे हा प्रचार जनतेच्या गळी उतरण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. मोठ्या प्रमाणावर धार्मिक प्रचारसाहित्याचे वाटप सुरू झाले. याचा व्हायचा तो परिणाम झालाच. इस्लामी कट्टरवादी प्रवृत्तींना बळी पडलेल्या जनभावनांसमोर सरकारला झुकावे लागले. पूर्व पाकिस्तानच्या काळात शाळांमधून शिकविल्या जाणा-या ‘इस्लामियत’व ‘अरेबिक’चा पाठ्यक्रम सरकारला पुन्हा सुरू करावा लागला. कट्टरवाद्यांना शांत ठेवण्यासाठी इस्लामी अकादमीच्या उपक्रमांना शासकीय मदत मिळायला सुरूवात झाली. यानंतरच मुस्लिम जगाने बांगलादेशच्या अस्तित्वाची दखल घेतली. शेख मुजिबूर यांना १९७४ मध्ये लाहोर येथे झालेल्या मुस्लिम राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेमध्ये निमंत्रित करण्यात आले. आवामी लीगनेही बांगालादेशची इस्लामी प्रतिमा अधिक सुदृढ करण्यासाठी बांगलादेशमधील इस्लामी संस्था व उपक्रम यांना भरघोस साहाय्य करायला सुरूवात केली. जमात-ए-इस्लामीने इस्लामी देशांमध्ये बांगलादेशची प्रतिमा ‘इस्लामविरोधी’, ‘अल्लाला न मानणारा देश’अशी करून दिली आणि आवामी लीग सरकारवर ‘संविधानातले इस्लामविरोधी अडथळे’ दूर करण्यासाठी दबाव टाकायची मागणी केली. ज्या देशाने आणि पक्षाने आपली भाषिक आणि सांस्कृतिक विरासत जपत आपल्या देशाला इस्लामच्या मार्गावरून बाजूला करून, लोकशाहीची निधर्मी तत्वे अनुसरून विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला त्याच पक्षाला पाकिस्तान व आयएसआय यांनी पोसलेल्या इस्लामी कट्टरवाद्यांच्या डावपेचासमोर झुकून सरकार वाचवण्यासाठी देशाच्या निधर्मी तत्वाला बळी द्यावे लागले. बांगलादेशातील इस्लामच्या वर्चस्वाची आणि भारताबद्दलच्या विद्वेषाची हीच नांदी होती.
बांगलादेश व भारताचे हितसंबंध
बांगलादेशमध्ये वाढत्या इस्लामी मूलतत्ववादी प्रवृत्तींच्या प्रभावात पहिला बळी भारताचे मित्र व राष्ट्रनिर्माते बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांचा गेला. १५ ऑगस्ट १९७५ साली रक्तरंजित विद्रोहामध्ये शेख मुजिबूर रहमान यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे भारत व बांगलादेश यांच्यातील मित्रत्वाच्या व परस्परविश्वासाच्या संबंधांची इतिश्री झाली. शेख मुजिब यांच्या हत्येनंतर जन. हुसैन महम्मद इर्शाद यांच्या शासनकाळात बांगलादेशाच्या राष्ट्रजीवनात इस्लामचा प्रभाव वाढला. तो इतका वाढला की १९८२ साली संविधानात एक महत्वाचा बदल केला गेला. या बदलानुसार इस्लाम हा बांगलादेशचा प्रमुख धर्म म्हणून स्वीकृत करण्यात आला. निधर्मी, बंगाली भाषा व संस्कृतीचा अभिमानी बांगलादेशाने कट्टर मूलतत्ववादी इस्लामी राष्ट्राचे स्वरूप स्वीकारले. भारताला पाकिस्तान पेक्षाही घातक असा शत्रू निर्माण झाला होता. भारताच्या हस्तक्षेपाशिवाय बांगलादेश स्वतंत्र होऊ शकला नाही हे वास्तव स्वीकारणे बांगलादेशला जड गेले आहे. तुम्ही मदतीला आला नसतात तरी आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवले असते अशी भावना बांगलादेशी जनतेची बनत गेली आहे. बांगलादेश व भारत यांच्यात यानंतरच्या काळात अनेक काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले. त्यातील महत्वाच्या प्रश्नांचा आढावा घेणे उचित ठरेल.
गंगेच्या पाण्याचे वाटप : भारतातून निघणारी गंगा नदी वेगवेगळी रूपे घेत, विविध प्रदेशात वेगवेगळी नावे धारण करीत बंगालच्या उपसागराला मिळते. भारत व बांगलादेशामध्ये गंगेच्या पाण्याच्या वाटपावरून समस्या आहेत. १९९६ मध्ये भारत व बांगलादेशमध्ये झालेल्या तहानुसार ३० वर्षीय पाणी वाटपाचा ठराव स्वीकृत करण्यात आला आहे. या ठरावानुसार बांगलादेशचा हक्क मान्य करण्यात आला. पण त्यानंतरही बांगलादेशची कुरबूर सुरूच असते.
फराक्का धरणाचा वाद: गंगेच्या महापूराला नियंत्रित करण्यासाठी व गंगेच्या प्रवाहाला प. बंगालातील हुगळी नदीच्या प्रवाहात सोडण्याच्या हेतूने फराक्का धरणाची निर्मिती भारताने केली. प. बंगालमध्ये बांगलादेशच्या सीमेपासून १०कि.मी. अंतरावर भागिरथी नदीच्या पात्रावर हे धरण आहे. या धरणामुळे बांगलादेशातल्या नद्या सुकतात असा बांगलादेशचा दावा आहे.
तीन बिघा जमीनीचा वाद: भारत व बांगलादेश यांच्यातील तीन बिघा जमीनीचा भारतीय प्रदेश. याचा उपयोग बांगलादेशी नागरिक भारतात प्रवेश करण्यासाठी करीत असत. हा प्रदेश भारताने बांगलादेशला लीज वर दिला होता. १९९२ साली देशातील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या मताला न जुमानता भारत सरकारने हा आपला भूभाग बांगलादेशला सुपूर्द केला.
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न
भारताला सर्वात घातक ठरलाय तो भारतामध्ये घुसलेल्या बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न! एखाद्या देशात ज्यावेळी यादवी माजते त्यावेळी त्या देशातील नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी परांगदा होतात, स्थलांतरित होऊन दुस-या देशाचा आश्रय घेतात. बांगलादेशातील २० दशलक्ष नागरिकांनी बांगलादेशाच्या निर्मितीच्या काळात भारतात असा आश्रय घेतला होता. परंतु बांगलादेश स्थिरस्थावर झाल्यावरही हा ओघ असाच चालू राहिला आहे. आजमितीस पाच करोड पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करून आहेत असा खात्रीशीर अंदाज आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे प. बंगाल व आसाम या राज्यांमधील लोकसंख्येचे संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. भारताची बांगलादेशाशी जोडलेली सीमा खुली आहे. तिथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या अस्थायी आहेत. भारताच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी जवळपास ५०लाख बांगलादेशी घुसखोर आसाम मध्ये असल्याचे मान्य केले होते. आसामच्या राज्यपालांनी केंद्राकडे पाठवलेल्या अहवालात दर दिवसाला ६ हजार बांगलादेशी भारतात घुसखोरी करीत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जागतिक जनगणनेत बांगलादेशातून १ लाख नागरिक बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगलादेशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही हे मान्य केले आहे. आसामममधील हिंदूंची धार्मिक स्थळे घुसखोरांनी बळकावली आहेत. आसामची ८५लाख बिघे जमीन तसेच काझीरंगा येथील राष्ट्रीय उद्यानावर बांगलादेशींनी अतिक्रमण केले आहे. या उद्यानात हत्ती, गेंडे यांना पाहायला जाणा-या पर्यटकांना बांगलादेशी घुसखोरांच्या झोपड्यांचे दर्शन मात्र होते. गेली अनेक वर्षे भारतात अनधिकृतपणे राहाणा-या बांगलादेशीनी इथल्या युवतींशी विवाह करून इथल्याच मुस्लिम समाजात ते बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. बांगलादेश व बिहार च्या सीमावर्ती भागांना एकत्र करून ग्रेटर बांगालादेश निर्माण करण्याचे प्रयत्न जिहादी संघटनांनी चालवले आहेत.
बांगलादेशाची तालिबानच्या दिशेने वाटचाल –
पाकिस्तान व मुस्लीम लीगने बांगलादेशमध्ये जिहादी उन्मादाचे जे बीज पेरले त्याची विषाक्त फळे आज बांगलादेशातील जनता आणि भारताला भोगावी लागत आहेत. अलिकडच्या काळात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हरकत-उल-जिहाद-इस्लामी (HUJI-B) या बांगलादेशातील दहशतवादी संघटनेचा सक्रीय सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या १९९१ ते १९९६ या काळातील राजवटीत बांगलादेशच्या भूमीचा वापर पॅन-इस्लामसाठी खुलेपणाने करण्यास सुरूवात झाली. त्यांच्या दुस-या राजवटीत (२००१-२००६) भारतातील पूर्वोत्तर राज्यांमधील दहशतवादी संघटनांना आश्रय व प्रशिक्षण देण्याचे धोरण बांगलादेशाने राबविले. भारत सरकारने बांगलादेशातील दहशतवादी कॅम्पसची यादी खालिदा झिया यांना पाठवली. त्यांनी ती अमान्य करून फेटाळून लावली. या जिहादी संघटनांना अल कायदाच्या आश्रय मिळाला आहे. हुजी ही संघटना अल कायदाच्या आर्थिक पाठिंब्यावर तालिबानच्या धर्तीवर बांगलादेशावर राज्य करण्याचे मनसुबे १९९२ पासून आखत आहे. ‘आमरा सोबिया हाबो तालिबान, बांगला होबे अफगाणिस्तान” असे नारे बांगलादेशमध्ये हुजी, बांगलादेश इस्लामिक जिहाद, हरकत-उल-अन्सार, जमैत-उल-अन्सार, जमैत-उल-उलेमा यासारख्या अनेक मूलतत्ववादी इस्लामी संघटना संघटना अनेक वर्षांपासून देत आहेत. या संघटना बांगलादेशात राहून आंतरराष्ट्रीय इस्लामी संघटनांसोबत कार्यरत आहेत. या सर्व संघटनांचे स्वाभविक व जवळ्चे मोठे लक्ष्य भारत आहे.
आजचा बांगलादेश काय म्हणतोय?
शेख हसिना यांना निर्विवाद बहुमताने सत्ता सुपूर्द केलेल्या बांगलादेशी जनतेला हवे आहे स्थैर्य! शेख हसीना यांनी निवडणुक जाहीरनाम्यामध्ये दहशतवादाला संपुष्टात आणण्यासाठी कठोर उपाय करण्याचे व धार्मिक कट्टरवादाला पायबंद घालण्याचे वचन जनतेला दिले होते. या वचनाला सत्यात आणण्यासाठी जनतेने दिलेला हा कौल आहे. सततच्या राजकीय स्थित्यंतरातून जाणा-या बांगलादेशी जनतेला मूलतत्ववादी इस्लामी संघटनांच्या प्रतिगामी मार्गापेक्षा विकासाचा मार्ग हवासा वाटू लागला आहे. महंमद युनुस यांनी केलेल्या बचतगटांच्या व ग्रामीण बॅंकेच्या क्रांतिकारी प्रयोगामुळे सर्वसामान्य जनतेने आर्थिक स्थैर्याचा अनुभव घेतला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या भूमीचा वापर दहशतवादी प्रवृत्तीना न करू देण्याची ग्वाही दिली आहे. द. आशियातील सर्व देशांनी दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी संयुक्त दहशतवादी दल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबद्दल त्यांना जमात-ए-इस्लामी या संघटनेने इशाराही दिला आहे. येत्या काळात जर शेख हसिना यांनी दहशतवादाविरूध्द आपली मोहीम अशीच सुरू ठेवली तर त्यांचे वडील बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्याप्रमाणे त्यांच्या जीवाला धोका निश्चित आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचे बांगलादेशी सैन्यातील नेटवर्क स्थिर सरकारला कधीही अस्थिर करू शकते. तसे प्रयत्न नवीन सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच झाले. पण त्यातूनही शेख हसिना यांनी आपल्या सरकारला व देशवासीयांना सावरले आहे.
काळाची गरज
“आमार शोनार बांगला, आमी तोमाए भालोबाशी” हे राष्ट्रगान हृदयाशी जपून गाणारा बांगलादेश “आमरा सोबिया हाबो तालिबान, बांगला होबे अफगाणिस्तान” चे नारे कधी देऊ लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही. या देशाने स्थापनेपासून ४ लष्करी बंडे पाहिली, २ शासकांची राजकीय हत्या पाहिली, १३ राष्ट्रशासकांच्या शासनकाळात कायम देशात उलथापालथ अनुभवली. बंगाली भाषा व संस्कृतीचा स्वाभिमानी समाज ते कट्टर इस्लामचा पुरस्कर्ता असे दोन अगदी भिन्न चेहरे वागवित बांगलादेश या राष्ट्राचा प्रवास गेली ३८ वर्षे सुरू आहे. यातला आपला खरा चेहरा कोणता याचा शोध अजुनही त्याला लागलेला नाही. स्वतःचीच खरी ओळख हा देश अजुन शोधतो आहे. एक निधर्मी राष्ट्र म्हणून जगासमोर यायचे की जगभर फैलावणा-या इस्लामी कट्टरतेची शेखी मिरवायची याचा निर्णय अजून बांगलादेशमधील राज्यकर्ते घेऊ शकले नाहीत. मदत करू पाहाणा-या भारताला झिडकारण्याचे धोरण आणि इस्लामी राष्ट्रांमध्ये मान्यता मिळवण्याची धडपड यामुळे या देशात इस्लामचे वारे वाहिले पण विकासाची ब्रम्हपुत्रा अजून हवी तितक्या प्रमाणात वाहिलेली नाही. उष्ण कटीबंधामुळे प्रचंड पाऊस, चक्रीवादळे सततचे महापूर याचा सामना बांगलादेशी जनतेला नेहमीच करावा लागतो. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थैर्य आवश्यक असते. पण यापैकी कोणतेच स्थैर्य बांगलादेशी जनतेने अनुभवलेले नाही. सततचे राजकीय उद्रेक, सैनिकी बंड यांमुळे इथल्या जनतेचा आवाज दडपला गेला. १९७१ साली भाषिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर संघर्ष करून पाकिस्तानच्या पासून वेगळे होऊन निधर्मी लोकशाही कडे निघालेला बांगलादेश एक अतिकट्टर इस्लामिक राष्ट्र अशी ओळख घेऊन आज वावरतो आहे. या काळात भारतीय राज्यकर्त्यांच्या मुत्सद्देगिरीची खरी कसोटी लागणार आहे. १९७१ साली बांगलादेश स्थापनेच्यावेळी असणारे भारत व बांगलादेशाचे संबंध पुन्हा पूर्ववत होतील अशी परिस्थिती आहे. ३८ वर्षांपूर्वी पाकिस्तानापासून दूर होताना आपल्या ख-या स्वरूपाला जपण्यासाठी संघर्ष करणारा बांगलादेश ३८ वर्षांनी आज पुन्हा नव्याने आपली खरी ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या या प्रयत्नात आपण त्याच्या सोबत राहिलो तर दहशतवादासारख्या समस्येवर लढण्यासाठी बांगलादेशासारखा मित्र भारताला मिळेल. यातूनच घुसखोरीसारख्या अनेक जटील प्रश्नांवरही तोडगा निघेल असे निश्चितपणे वाटते. म्हणूनच भारताच्या आस्तित्वावर उठलेल्या धर्मांध शक्तिंची पाळेमुळे याच बांगलादेशात आहेत याचे भान ठेवत या देशाला विकासाच्या व स्थैर्याच्या दिशेने नेऊ पाहाणा-या शेख हसिना यांच्या प्रयत्नांच्या मागे आजच्या घडीला भारताला खंबीरपणे उभे राहावे लागणार आहे.
लेखक
मिलिंद मोहन आरोलकर
संशोधन व प्रलेखन विभाग प्रमुख,
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
—————-

“कान्हेरी” या निवडणूक विशेषांकात प्रसिध्द झालेला लेख

सुदृढ लोकशाहीचे मूलाधार

- मिलिंद मोहन आरोलकर

मतदार राजा जागा हो

निवडणूक ही नांदी आहे

मुजोरांना हाकलण्याची 

हीच एक संधी आहे….

१९९५ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यावर, गावागावात आम्ही फिरत होतो. कोणत्या पक्षाच्या प्रचारासाठी नाही, तर जनतेमध्ये मतदानाविषयी, लोकशाहीची मूल्य रूजवण्यासाठी जनसंघर्ष अभियानाचा एक भाग म्हणून तरूण कार्यकर्त्यांचे गट महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात, वस्त्यांमधून, पाड्यापाड्यावर जाऊन जनतेला जागे करत होते. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांच्या माध्यमातून चालवले जाणारे शासनतंत्र ही व्याख्या आपण सर्वांनी वाचली आहेच. त्याच लोकांना, सर्वसामान्य माणसाला तोच या लोकशाहीचा खरा राजा आहे हे पटवून देण्यासाठी जनसभा, पथनाट्य, भाषणे या सोबत शेकडो पोस्टर्स, स्टीकर्स, पत्रके यांच्या माध्यमातून शेकडो तरूण विद्यार्थी विद्यार्थिनी जनतेशी संवाद साधत होत्या. आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर देशहितासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी आवर्जून मतदान करा हा संदेश घेऊन तरूण कार्यकर्त्यांनी ही मोहीम मांडली होती. समाजाला काही शिकवण्याचा आविर्भाव यात अजिबात नव्हता. सहज संवादातून, आत्मीयतेच्या भावनेतून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचत होता. लोक राजकीय पक्षांच्या गाड्यांपेक्षा या विद्यार्थ्यांच्या येण्याची वाट पाहात. राजकीय पक्षांच्या गाड्या कश्याकश्याने भरलेल्या असत आणि विद्यार्थी रिकाम्या हाताने येत. तरीही त्यांच्या बोलण्यातला सच्चेपणा, देशहिताचे आवाहन या गोष्टी निवडणूकांच्या वातावरणात नवीन होत्या. बायाबापड्यांना गेल्या ५०-५५ वर्षांत प्रथमच मतदानाकडे पाहाण्याची नवी दृष्टी मिळालेली होती. यामुळे आपल्याला लाचार करून मतांचा बाजार मांडणा-या राजकीय नेत्यांपेक्षा या तरूणांनाच मनाने मतदान करून टाकले. 

लोक विचारत, “तुम्हीच आम्हाला सांगा तुमचा उमेदवार कोण! सांगा, कोण चांगले आहेत….आम्ही तुमचे ऎकू…तुम्ही सांगाल त्याला मतदान करू…”. पण आम्ही त्यांना नम्रपणे सांगत असू की आम्ही कोणाचाही राजकीय प्रचार करायला निघालेलो नाही. मतदान करणे ही देशाच्या हितासाठी, स्थैर्यासाठी एक अत्यावश्यक आणि पवित्र अशी कृती आहे हेच सांगायला आम्ही आलो आहोत. सत्तेतील राजकीय पक्ष आणि नेते यांच्या गृहीत धरण्याला जनता विटली होती, पर्याय शोधत होती.  नेमक्या या वेळीच जनतेसमोर लोकशाहीचे एक आशादायी चित्र किमान रेखाटण्यात तरी आम्ही यशस्वी झालो होतो असे आता वाटते.

जनसंघर्ष अभियानातल्या या अनुभवांची आठवण पुन्हा एकदा झालीय १५ व्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे. सध्या देशात निवडणूकीचे वारे पुन्हा एकदा वाहात आहेत. लोकशाहीतील आपल्या हक्कांबाबत जागृत झालेले अनेक गट  राजकारणाबद्दल, राजकारण्यांच्या कार्यपध्दतीबद्दल आपापल्या एनजीओंमार्फत मतदारांच्या राजकीय प्रबोधनासाठी कार्य करताहेत. परिसंवाद, पथनाट्य, पत्रके यांसोबतच विविध वाहिन्यांमध्येही याबद्द्ल जाहिराती प्रकाशित होताहेत. अनेक उत्पादनांनी मतदारांची जाणीव जागृती हीच आपल्या जाहिरातीची मुख्य संकल्पना म्हणून स्वीकारली आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जी भयभावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली, त्याचा उद्रेक लगेचच दिसला. गेट वे ऑफ इंडीयावर जमलेल्या हजारोंनी राजकीय पक्षांच्या नावाने अक्षरशः शिमगा केला. या उद्रेकाचा, संतापामागची भावना समजण्यासारखी आहे. परंतु देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांना व सर्व समस्यांना केवळ आणि केवळ राजकीय पक्ष आणि राजकारणीच जिम्मेदार आहेत या भावनेचेच प्रदर्शन जास्त मांडले गेले. राजकीय पक्ष नकोत, मतदान करताना नकारात्मक मतदान करा हे संदेश घेऊन आज अनेक एनजीओ आक्रमक प्रचार करीत आहेत. भारतावर सातत्याने होणारे दहशतवादी हल्ले हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे. त्याचा मुकाबला धेर्याच्या भावनेने केला गेला पाहीजे. देशाच्या शत्रूना धडा शिकवण्यासाठी एकत्र येण्याच्या शपथा वाहील्या जाणे आवश्यक असताना, हतबलतेतून निर्माण झालेल्या डरपोकपणाचेच प्रदर्शन जास्त झाले. हतबलतेतून आलेल्या नैराश्यातूनच राजकारण्यांना जबाबदार मानून त्यांची निर्भत्सना करण्याची मानसिकता निर्माण झाली असे म्हणावे लागेल. या घटनेनंतर देशातील खेडोपाड्यांतील आबालवृध्द हातात मशाली चेतवून शहीदांच्या प्रतिमांसमोर देशावर हल्ला करणा-यांना ठेचून काढण्याच्या आणाभाका घेत असताना मुंबईत मात्र मेणबत्त्या लावून मातम मनवले जात होते. गंमत म्हणजे, नोव्हेंबर मध्ये जो नवमतदार, नव्या पिढीचा प्रतिनिधी असणारा तरूण कोणीतरी हातात सारलेल्या मेणबत्त्या लावून तोंड फाटेपर्यंत राजकारण्यांना, शासनाला अभद्र शिव्यांची लाखोली वाहात होता, तोच ३१ डिसेंबरला धुंद होऊन मॊजमस्ती मध्ये दंग होता. ही विसंगतीच देशाच्या सद्यस्थितीला जबाबदार आहे असेही म्हणावे लागते. समाज जेव्हा स्वहितापेक्षा राष्ट्रप्रेमाला प्राधान्य देतो तेव्हा क्रांतिकारक जन्माला येतात आणि जेव्हा हाच समाज स्वार्थांध होतो तेव्हा तो घडणा-या प्रत्येक वाईट घटनेचे उत्तरदायित्व दुस-या कोणाच्या तरी गळ्यात घालून मोकळा होतो. 

आज नवमतदार म्हणून भारतातील तरूण पिढी लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवाला म्हणजेच १५ व्या लोकसभा निवडणूकीला सामोरी जाणार आहे.  जागरूकता वाढली आहे पण लोकशाही म्हणजे नक्की काय याचे भान मात्र कुठेतरी हरवले आहे की काय हे सातत्याने जाणवत राहते. या अनुषंगाने मतदारांचे प्रबोधन व लोकशाहीतील त्यांच्या भूमिकेचे चिंतन, मनन सुध्दा होण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर आपल्या हक्कांविषयी प्रचंड जागृत झालेला आजचा आणि उद्याचा मतदार मात्र आपल्या कर्तव्यांविषयी कायम अनभिज्ञ राहील. जेव्हा मतदार लोकशाहीतील आपल्या सहभागाबद्दल निष्क्रीय राहातो, तेव्हा त्याचा सरळ परिणाम लोकशाहीवर होतो. निष्क्रीय मतदार मतदानाला जात नाही. गेलाच तर प्रलोभनाला बळी पडतो. याचा फायदा लोकशाहीची मूल्ये न बाळगणा-या काही राजकीय पक्षांकडून गेली अनेक वर्षे केला गेला आहे. 

गेल्या काही वर्षांत संसाधने, मूलभूत सोयीसुविधा आणि आर्थिक सुबत्तेत वाढ झालेली दिसली तरी ती सर्वव्यापक नाही. देशातील अगदी शेवटचा घटकही सुखी समाधानी आहे असे चित्र नाही. शहरात वीज पण गावांत जवळजवळ १६ तास लोडशेडींग अशी स्थिती. कृषिप्रधान देश, पण गेल्या दशकात दीड लाखांहून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. “द हिंदू” या वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या अभ्यासानुसार, १९९७ ते २००७ या दशकात १८२९३६ शेतक-यांनी देशात आत्महत्या केल्या. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ ही राज्ये यात आघाडीवर आहेत. सर्वसामान्य आत्महत्यांपेक्षा शेतकरी आत्महत्या या अधिक वेगाने होत आहेत.

 

वरील सर्व प्रश्नांसोबत, देशातील वाढती बेरोजगारी, आतंकवाद, सामाजिक असुरक्षितता, आर्थिक विषमता, भ्रष्टाचार, देशाच्या असुरक्षित सीमा, या व अशा सर्व प्रश्नांकडे पाहाण्याची राजकीय पक्षांची असंवेदनशील वृत्ती याचा विपरित परिणाम मतदारांवर होत आला आहे. प्रादेशिक पक्षांच्या उदयामुळे राष्ट्रीय हितापेक्षा स्थानिक अभिनिवेशाचे मुद्दे राजकारणात प्रबळ ठरताना दिसताहेत. विविध राज्यांतील विधान भवनांमध्ये व संसदेमध्ये आमदार खासदारांची विधिनिषेधशून्य वर्तने आपण दूर्चित्रवाणीवरून नेहमीच पाहातो. ते पाहून आपण यांना का निवडून दिले हा प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो. 

भारतातील मतदान – उत्सव, कर्मकांड की राष्ट्रीय कर्तव्य

१९६७ साली अमेरिकेतील वॉशिंग्ट्न येथून Civic Education Service या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या INDIA-WORLD’S BIGGEST DEMOCRACY या पुस्तकात How The Biggest Democracy Works या मथळ्याखाली भारतातील १९५२, १९५७ व १९६२ या वर्षी झालेल्या तीन निवडणुकांचे चित्र रेखाटले आहे. त्यात लिहिले आहे-

Is It a Carnival or Election?

When Election Day finally comes around, voters begin to flock to the polls even before they open. It is a big occasion and many of the women wear their best dresses. Rival parties have small areas set aside for them as near the voting booths as possible. Each tries to outdo the order in providing entertainment for adults and their children who tag along for the fun. Youngsters may have their first chance to ride in a camel cart or truck. For all Indians, participating in democracy is a new experience. The fact that so many take part could be the biggest sign of hope for the country’s future, but it is unfortunate that most of the people who vote are still illiterate and uninformed. The idea of democracy actually has deep roots in India. It started in the country’s villages some 800 years before Christ. 

भारताची लोकशाही नवजात असताना मतदानाचा उत्साह सर्वसामान्य जनतेत होता. स्वातंत्र्याची म्हणजेच भाषणस्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य, लोकप्रतिनिधी निवडीचे स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य या सगळ्याचा अनुभव घ्यायला भारतातील निरक्षर पण भोळीभाबडी जनता उत्सुक होती. ब्रिटीशांच्याच नव्हे तर त्याआधीच्या परकीय मुस्लिम शासकांच्या शेकडो वर्षांच्या पराधीनतेतून मिळालेले स्वराज्य अनुभवणारी ती स्वतंत्र भारताची पहिली पिढी होती. परंतु एतद्देशीयांनी निर्माण केलेले “स्वराज्य” आले तरी ते “सुराज्य” मात्र नाही याचा अनुभवही याच पिढीने घेतला. सगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार जनतेचा भ्रमनिरास करू लागला. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या ते नाहीसे झाले आणि वेगळ्याच लोकांचे चेहरे राजकारणी म्हणून लोकांना दिसू लागले. त्यात कॉंग्रेसी मंत्र्यांनी आपल्या सत्तेचे जे ओंगळवाणे प्रदर्शन मांडले होते, त्यामुळे जनता विस्मयचकित झाली. ब्रिटीश गेले तरी जे जे विलायती ते ते उत्कृष्ट आणि जे जे भारतीय ते ते निकृष्ट हा मूलमंत्र प्रस्थापित झाला. भारत स्वतंत्र झाला तरी कोणतीच गोष्ट राजकीय नेते यांच्याशिवाय भारतीय व स्वदेशी दिसेना. 

आणीबाणीचे दिवस आणि लोकशाहीचे धिंडवडे

लोकशाहीचे धिंडवडे जनता पाहात होती. १९७५ साली त्याचे पूर्णतः झालेले अधःपतन जनतेने पाहीले. इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ रोजी लादलेल्या आणीबाणीने तर जनता जनतंत्राच्या सुंदर स्वप्नातून खडबडून जागी झाली. आचार्य विनोबा भावे यांच्यासारख्या संतांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणा-या या दुःशासनपर्वाला “अनुशासनपर्व” असे नाव दिले असले तरीही सामान्य जनता मात्र यात होरपळली जात होती. स्वतंत्र भारतात असे काही होईल याचा विचारही कोणी केला नव्हता. Democracy in Asia या पुस्तकाच्या लोकशाहीसंदर्भात Persistence, Erosion, Breakdown and Renewal या पहिल्या प्रकरणात लेखक लॅरी डायमंड यांनी  भारतातील तत्कालीन परिस्थितीचा वेध घेतला आहे. ते म्हणतात -

” India, despite the steady erosion of democratic institutions and the two years of authoritarian emergency rule under Indiara Gandhi, and the continuing political strains under her son and successor Rajiv Gandhi, continues to stand as the most surprising and important case of democratic endurance in the developing world. 

(लोकशाहीतील या दुःखद अध्यायाबद्दलचे वर्णन, चित्रण आणि लेखन तत्कालीन अनेक भारतीय विचारवंतांनीही केले आहे. परंतु ते स्वाभाविकपणे कॉंग्रेस व इंदिरा गांधी यांच्या विरोधातील असल्याने त्याचे दाखले दिले तर त्या लिखाणाला संकुचित व द्वेषमूलक मानले जात आले आहे.)

लोकशाहीप्रती अविश्वासाचा प्रारंभ

भारतातील लोकतांत्रिक व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास आणीबाणी लादल्यावर कमी व्हायला सुरूवात झाली. २६/११ च्या हल्ल्यानंतरचा जनक्षोभ हा त्याचा आजच्या काळातील प्रतिध्वनी आहे. आजच्या भारतीय राजकारणाचे जे नैराश्य उत्पन्न करणारे चित्र आहे त्याची सुरूवात १९८० साली जनता पार्टीला हरवून इंदिरा गांधी आणि इंदिरा कॉंग्रेस जेव्हा पुन्हा सत्तेवर आल्या त्यावेळपासून झालेली आढळते. सत्तेसाठी सत्ता आणि त्यासाठी कोणत्याही मार्गाने ती बळकावायची यासाठी सर्व प्रकाराचा अवलंब यानंतरच्या काळात झालेला आपल्याला आढळतो. लोकशाहीतील राष्ट्रपतिपदासारख्या सर्वोच्च संस्थांना क्षुल्लक पक्षीय राजकारणासाठी वापरून घेणे या संकल्पनेचा वापरही याच काळात प्रथम राजकारणात केला. तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली अहमद यांनी इंदिरा गांधींच्या आदेशावरून सर्व संकेत धुडकावून लावीत घटनेच्या ३५२ व्या कलमानुसार आणीबाणी लादली होती. 

Government and Politics in South Asia या ग्रंथामध्ये या कालखंडाचे वर्णन पुढील शब्दांत केले आहे-

Indira Gandhi adopted a devide -and-rule approach to state politics and was reinforced in this attitude by Sanjay Gandhi’s determination to teach opponents a lesson. Her declaration of national emergency and suspension of fundamental rights in 1975 reflected Sanjay Gandhi’s influence and the rise of extra-constitutional power centre in the prime minister’s household. As a result, Indian politics aquired a dual character. 

While elections were free and fair under supervision of the Indian Election Commission and international observers, the decision making process in the political and policy spheres had a secretive and manipulative character.

पैसा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, लाचार आणि लुब्र्या नेत्यांचा उदय हा १९८० च्या दशकाने भारतीय लोकशाहीला दिलेली देणगी आहे असे मानावे लागेल. इंदिरा गांधींनी स्वत:भोवती जी लाचारांची फॊज निर्माण केली तीच भारतीय राजकारणाची प्रतिमा म्हणून जगभर कुप्रसिध्द आहे. लोकशाहीची, त्यातील संस्था व मूल्यांची विटंबना गेल्या तीन दशकात अधिक झाली आहे ज्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. 

लोकशाही मूल्यांचे अधःपतन 

१९८० नंतर जे प्रवाह राजकारणात आले त्यात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचा पडलेला किंवा पाडलेला प्रघात हा सर्वात अग्रस्थानी आहे. लोकशाहीकडे केवळ सत्ता प्राप्त करण्याचे एक साधन मानणा-यांनी अल्पसंख्यांकांना स्वत:च्या पक्षीय स्वार्थासाठी केवळ वापरून घेतले आहे असे स्पष्टपणे दिसते. अल्पसंख्यांकांच्या अल्पसंख्यांकांच्या विशेषतः मुस्लिमांच्या अनुनयामुळे लोकशाहीच्या पवित्र मूल्यांना धक्का बसलाच आहे पण मुस्लिम समाजाचे सामाजिक नुकसानही केले आहे. १९६० पासून कॉंग्रेस शिवाय इतर राजकीय विचारधारांचे विशेषत: जनसंघाचे प्रभुत्व भारतीय जनमानसावर अधिकाधिक अधोरेखित होत असल्याचे दिसत होते. कॉंग्रेस संस्कृतीला हे पचनी पडणे अवघड होतेच. त्यात देशाला ज्या कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले ती हीच, हा भ्रम पसरविण्यात कॉंग्रेसी नेतृत्व यशस्वी झालेले होतेच. या वातावरणात कोणत्याही परिस्थितीत राजकीय प्रभुत्व कायम राखण्याच्या नादात कॉंग्रेस नेतृत्वाने देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरलेला मुस्लिम अनुनय एक राजकीय रणनीती म्हणून सक्रीयपणे व्यवहारात आणला. हाच मुस्लिम अनुनय आज पुन्हा एकदा देशाच्या अखंडतेला जडलेला कॅन्सर ठरला आहे. आणि त्यामुळेच “राष्ट्राच्या संसाधनावर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे” हे दुर्दैवी आणि देशातील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावणारे विधान या देशाचे पंतप्रधान सहजपणे करून जातात. देशाच्या निधर्मी (सेक्युलर या शब्दाचा खरा अर्थ.) तत्वांचा अंगिकार ज्या राष्ट्राने  हजारो वर्षे केला तिथे केवळ मुस्लिम आहे म्हणून देशाच्या सार्वभॊमत्वाला आव्हान देऊन संसदेवर हल्ला करणा-या देशाच्या शत्रूला सर्वोच्च न्यायालयाने बजावलेली फाशीची शिक्षा अमलात आणण्याचा निर्णय भारत सरकार अजूनही घेऊ शकलेले नाही.

निवडणूका व राजकीय पक्षांचे लोकशाहीतील स्थान

जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे राजकीय पक्षांबद्दले चिंतन हे सर्व राजकीय कार्यकर्त्यांनाच नाही तर सामान्य मतदारालाही मार्गदर्शक ठरणारे आहे. ११ डिसेंबर १९६१ च्या ऑर्गनायझर च्या अंकात राजकीय पक्ष कशासाठी याचे विवेचन करताना पंडितजी लिहितात, ”  राजकीय पक्ष म्हणजे केवळ सत्ताकांक्षा नाही तर विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला आणि स्वतःची ध्येयप्रणाली असणारा समूह असावा. सत्ता हे आमचे साध्य नाही तर विशिष्ट उद्दिष्टांसाठी हाती घेतलेले साधन आहे तसेच यात समर्पणाची भावना आणि अंतः प्रेरित अनुशासन अभिप्रेत आहे.”  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे हे चिंतन राजनीती पेक्षाही राष्ट्रनीतीच्या जवळ जाणारे आहे. सर्वच राजकीय पक्षांना राष्ट्रउभारणीत आपल्या पक्षाची भूमिका कोणती आहे याचे मार्गदर्शन पंडितजींनी करून ठेवले आहे. जनसंघाची वाटचाल याच तत्वांवर झालेली होती व त्याचा अपेक्षित परिणामही जनमानसावर झाला होता. 

लोकशाहीमध्ये “राजकीय पक्ष” ही एक अपरिहार्य अशी संस्था आहे. वेगवेगळ्या विचारधारांचे, समाजगटांचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष हे सुदृढ जनतंत्राचे वैशिष्ठ्य आहेत. जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी विविध पर्याय दिले गेले पाहिजेत तसेच लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या समाजगटांचे प्रतिनिधीत्व करणारे राजकीय पक्षही हवेत.  आज ९०० राजकीय पक्ष भारताच्या राजकीय पटलावर विराजमान आहेत. भारतात चार प्रकारचे राजकीय पक्ष आढळतात. 

पहिले आहेत अखिल भारतीय पक्ष. जे राजकीय पक्ष लोकसभेमध्ये किमान ४ प्रतिशत मते किंवा जागा मिळवू शकतात, त्यांना राष्ट्रीय किंवा अखिल भारतीय पक्ष म्हणून गणले गेले जाते. राष्ट्रीय पक्ष हे अधिक व्यापकपणे राष्ट्राचा विचार करू शकतात. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांव्यतिरिक्त देशाचा म्हणून विचार करील असा तिसरा राजकीय पक्ष आज नाही. भारताचा (भारतीय नाही) कम्युनिस्ट पक्ष केवळ प. बंगाल व केरळ या दोन राज्यांतच वर्षानुवर्षे आपली पकड जमवून आहे. पण सद्यस्थितीत ती ही ढिली पडत आहे. 

राजकीय पक्षांच्या दुस-या गटात प्रादेशिक पक्ष येतात. हे पक्ष प्रादेशिक अस्मिता जोपासत मोठे होतात. विशिष्ट प्रदेशाचा भाषिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभिनिवेश समाजात उत्पन्न करून त्या आधारावर या पक्षांचा विस्तार होत असतो. एका विशिष्ट भॊगोलिक प्रदेशापुरतीच या पक्षांची ताकद मर्यादित राहाते. महाराष्ट्रात शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), तामिळनाडूतील ऑल इंडिया अण्णा DMK, आंध्र प्रदेशातील तेलुगु देशम पार्टी, जम्मू आणि काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्स तसेच आसाम मधील आसाम गण परिषद असे काही प्रादेशिक राजकीय पक्ष आपल्या चांगल्या परिचयाचे आहेत.

तिसरा गट आहे धार्मिक किंवा सामाजिक पायावर उभे राहाणा-या राजकीय पक्षांचा. शिरोमणी अकाली दल, मुस्लिम लीग यांसारखे पक्ष हे आपापल्या धार्मिक गटांचे कार्य हे आपापल्या गटांचे हित जोपासण्यापुरतेच मर्यादित असते. 

चॊथा गटामध्ये येणारे राजकीय पक्ष हे वलयांकित व्यक्ती किंवा एखादा तात्कालिक अभिनिवेशाचा मुद्दा या आधारावर निर्माण होतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा नुकताच उदयाला आलेला दाक्षिणात्य सिनेस्टार चिरंजिवी यांचा प्रजा राज्यम पक्ष हे या गटात मोडतात. 

राष्ट्रीय हिताचा विचार करायचा झाला तर अखिल भारतीय स्तराचे पक्ष हेच देशाच्या विकासाचा सर्वांगिण विकास करू शकतात. 

निवडणुकांसंदर्भातील सुधारणा (Electoral Reforms)

भारतीय निर्वाचन आयोगाने १४व्या लोकसभा निवडणुकांच्या समाप्तीनंतर पुढाकार घेऊन निवडणुकांच्या संदर्भातील सुधारणांबद्दलचा एक मसुदा तयार केला आहे. 

या मसुद्याच्या प्रस्तावनेमध्ये सुधारणांची आवश्यकता मांडताना तत्कालीन मुख्य निर्वाचन आयुक्त श्री. टी. एस. कृष्णमूर्ती म्हणतात-

Electoral reforms have been engaging the attention of the Parliament, the Government, the Press and also the Commission for a long time. The

Commission has been very regularly addressing the Government in the last six years on different subjects requiring reforms. Some measures were implemented in the past to remove glaring lacunae in the law. Based on the experiences in the just concluded general election to the 14th Lok Sabha and issues that have come up in the recent past, the Commission believes that further steps need to be taken quickly for amendment of certain provisions of law. (July 30, 2004)

 या मसुद्यात निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक अशा जवळ जवळ सर्व मुद्दयांचा परामर्श  घेण्यात आला आहे. त्यातील काही बहुचर्चित मुद्दे पुढील प्रमाणे-

  • गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची सत्यता, त्यांच्या मालमत्तेचे तपशील
  • अनामत रक्कम वाढविण्याची तरतूद
  • राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण
  • एकाच उमेदवाराने अनेक जागांवर निवडणूक लढविण्यावर निर्बंध
  • मतदानपूर्व व मतदानोत्तर सर्वेक्षणांबद्दल नियमावली
  • प्रसारमाध्यमांतून येणा-या अप्रत्यक्ष प्रसिध्दीवर निर्बंध
  • नकारात्मक किंवा तटस्थ मतदानाचे स्वातंत्र्य व तरतूद
  • मतदार नोंदणी अधिका-यांच्या आदेशावर आक्षेप घेण्याच्या तरतूदीसाठी अपिलीय अधिका-याची नेमणूक
  • राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहारांचे नियमन
  • शासनपुरस्कृत जाहीरातीवर निर्बंध
  • दूरचित्रवाणी व केबल नेटवर्क यांवरून प्रसारित होणा-या राजकीय जाहीरातीवर निर्बंध
  • निवडणूकांच्या पूर्वसंध्येला होणा-या निर्वाचन अधिका-यांच्या बदल्या

वरील मुद्दयांच्या अर्थपूर्ण अंमलबजावणीसाठी निर्वाचन आयोगासोबतच अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेत आहेत.

 

मतदारांचे प्रबोधन आणि जाणिव जागृती 

१५ व्या लोकसभेला सामोरा जाताना आजचा मतदार विशेषतः तरूण नवमतदार हा जास्त चोखंदळपणे निवडणुकांकडे पाहात आहे. काही वर्षांपूर्वीचा मतदार हा तहहयात एकाच राजकीय विचारधारेशी, पक्षाशी प्रतिबध्दता बाळगून होता. तो प्रत्यक्ष कार्यकर्ता नसला तरीही आपल्या राजकीय तत्वज्ञानाबद्दल अभिनिवेश त्याच्या मनात वसत असे. राजकीय पक्षही आपल्या पक्षाची वैचारिक भूमिका सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी जागरूक असत. भारतीय जनसंघ, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, प्रजासमाजवादी पक्ष, आंबेडकरी चळवळीशी संबंधित राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. पत्रके, पोस्टर्स, जाहीरनामे, विविध सामाजिक, राष्ट्रीय विषयांवरील पुस्तिका, पुस्तके, कार्य अहवाल अशा स्वरूपात राजकीय पक्षांची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचत असत. अगदी सर्वच नाही तरी काही राजकीय विचारधारांचे नेते मतदाराला केंद्रस्थानी मानून राजनीती करण्याची नैतिकता बाळगून असत. परंतु गेल्या काही वर्षांत ही साधने आणि मानसिकताही बदलली आहे. . मतदारांच्या सध्या काही नवपक्ष छापील साहित्यापेक्षा बोकाळलेली होर्डिंग व फ्लेक्स बॅनर यांद्वारेच आपले म्हणणे मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. मतदाराला विश्वासात घेण्यापेक्षा गृहित धरण्याची मानसिकता वाढीस लागल्याचे हे द्योतक आहे. मतदाराला वर्षानुवर्षे गृहित धरण्याच्या राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या अरेरावी वृत्तीमुळेच आजच्या मतदाराचा विश्वास लोकशाही व्यवस्थेवरून उडत चालला आहे. पण गेल्या साठ दशकांत राजकीय पक्ष जितके स्मार्ट झालेत तितकी जनताही झालेली आहे. मतदारांची पिढी बदलत आहे. प्रसारमाध्यमांच्या अल्पकाळातील सर्वदूर झालेल्या प्रसारामुळे आणि काही  स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळे जनताही अधिक सक्रियपणे लोकशाहीकडे, आपल्या लोकप्रतिनिधीकडे हळूहळू का होईना पण पाहू लागली आहे. पण हा वेग पुरेसा नाही. तो अधिक वाढण्यासाठी प्रयत्न व उपक्रमही वाढायला हवेत. त्यासाठी प्रत्येक सामाजिक संस्था, विविध मंडळे, स्थानिक समाजगट, सर्व प्रकारच्या सामाजिक संघटना यांनी आपापल्या स्तरावर मतदारांच्या जाणीव जागृतीसाठी सकारात्मक उपक्रम आखण्याची आवश्यकता आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ७ व ८ मार्च २००९ रोजी जनतंत्र २००९ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्याअंतर्गत गेल्या सहा दशकातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रचार साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रकट मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मतदार प्रबोधनाचा सकारात्मक सकारात्मक प्रयोग म्हणून या उपक्रमाचे वैशिष्ट्य नोंदले गेले आहे. 

 

सुदृढ लोकशाहीचे मूलाधार

उत्तरदायित्वाची भावना जोपासणारा लोकप्रतिनिधी आणि जागृत व सजग मतदार हेच कोणत्याही सुदृढ लोकशाहीचे मूलाधार आहेत. राजकीय पक्षांना देशाचा विचार करण्याचे काम “आऊटसोर्स” करून आपण सर्व मतदार मात्र स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांच्या मागे लागलो आहोत. काहीही बरे वाईट घडले की केवळ प्रतिक्रिया देण्याचेच राष्ट्रीय कर्तव्य आपण आपले मानले आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपला सहभाग नक्की कसा असावा याचा विचार एक नागरिक म्हणून फार कमी वेळा आपल्याकडून केला जातो. यामुळेच सामान्य नागरिकाला मतदानाव्यतिरिक्त कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सहभागी करण्याचा प्रयत्न एकही राजकीय पक्ष करताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण केलेले काम मतदांरांपर्यंत पोहोचवण्याची मानसिकताही फारच कमी लोकप्रतिनिधी बाळगतात. जनता व जनप्रतिनिधी हे एका रथाची दोन चाके आहेत. या दोघांनीही सुदृढ, निरोगी लोकशाहीतील आपल्या भूमिकेचा अधिक जागरूकपणे विचार केला पाहीजे. शेवटी लोकशाही ही सर्वांगिण सामाजिक न्यायासाठी उत्पन्न झालेली एक शासनव्यवस्था आहे. योग्य रितीने कार्यान्वित करणा-या सामाजिक इच्छाशक्तीवरच लोकशाहीची यशस्विता अवलंबून आहे. त्यामुळेच “मतदार राजा” असणा-या तुम्ही आम्ही सर्वांनी या जनतांत्रिक प्रक्रियेमध्ये अधिक प्रगल्भपणे सहभागी होणे हाच आपली देशभक्ती अभिव्यक्त करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.

—–

मिलिंद मोहन आरोलकर

संशोधन व प्रलेखन विभाग प्रमुख

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

संदर्भ सूची

पुस्तके

Government and Politics in South Asia

INDIA-WORLD’S BIGGEST DEMOCRACY 

India’s Democracy – An analysis of Changing State-Society Relations

The Politics of India Since Independance

Accountibility of People’s Representatives

 

वेब साईट

http://www.indian-elections.com/

http://lawmin.nic.in/

http://www.nationalelectionwatch.org/

http://www.adrindia.org

संदर्भांसाठी साहाय्य 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 

—————————————————————————————————————————————————

 

http://www.loksatta.com/daily/20070526/ch01.htm आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची सद्यस्थिती


çÆJçoYçç&lççÇuç Dççlcçnl³çç kçíÀuçíu³çç MçílçkçÀN³ççb®³çç cçáuççbvçç MçÌ#ççÆCçkçÀ¢äîçç oÊçkçÀ IçíC³ççmççþçÇ `DçVçoçlçç mçáKççÇ YçJç` nçÇ ³ççípçvçç jçcçYççT cnçUiççÇ ÒçyççíçÆOçvççÇ Jç `jímìç@jbì` çÆ®ç$çhçìç®çí çÆvçcçç&lçí DççÆpçlç Yçájí ³ççbvççÇ nçlççÇ IçílçuççÇ Dççní. ³çç ³ççípçvçí®çç ÒçkçÀuhç mçcçvJç³çkçÀ cnCçÓvç kçÀçcç kçÀjlççvçç, cçáuççb®ççÇ çÆvçJç[ kçÀjC³ç箳çç çÆvççÆcçÊççvçí ³çJçlçcççU çÆpçu¿ççlççÇuç DçvçíkçÀ Dççlcçnl³ççûçmlç kçáÀìábyççbvçç YçíìC³çç®ççÇ, l³ççb®çí ÒçMvç pçJçUÓvç pççCçÓvç IçíC³çç®ççÇ mçbOççÇ çÆcçUçuççÇ. l³ççlçÓvç DççkçÀU}í}í ní çÆ®ç$ç… 
çÆJçoYçç&lç MçílçkçÀN³ççb®³çç Dççlcçnl³çç Pççuçíu³çç ÒçoíMççlç çÆHçÀjlççvçç mççjKçí pççCçJçlç jçnlçí kçÀçÇ, kçáÀþílçjçÇ kçÀçnçÇlçjçÇ ®çákçÀuçí Dççní, ®çákçÀlçí Dççní. DççhçuççÇ cçlçí, MçnjçÇ mçcçpçálççÇ ³ççblççÇuç HçÀçíuçhçCçç pççCçJçlç jçnlççí. Içj®³çç kçÀl³çç& hçá©<ççvçí Dç®ççvçkçÀ DççlcçIççlç kçíÀuçç DçççÆCç DçJçIçí kçáÀìábyç DççÆvççÆ½çlçlçí®³çç içlçxlç {kçÀuçuçí içíuçí, DçMççÇ DçvçíkçÀ kçáÀìábyçí DççOççjnçÇvç DçJçmLçílç DçiççÆlçkçÀhçCçí pçiçlç Dççnílç. ³çç IçjçbcçO³çí çÆHçÀjlççvçç, l³ççb®³ççMççÇ mçbJçço mççOçlççvçç, DççhçCç nlçyçuç nçílç pççlççí. FLçí cççCçmççiççÆCçkçÀ ÒçMvç çÆvçjçUí Dççnílç. ³çç ÒçMvççbvçç GÊçjb cççiçç³çuçç nçÇ cççCçmçí Dççhçu³ççkçÀ[í ³çílç vççnçÇlç. l³ççbvçç mççbiçç³ç®ççÇ Dçmçlçí- l³ççb®³çç Gjçlç mçuçCççjçÇ J³çLçç! Dççpç nçÇ J³çLçç SíkçÀCççjç®ç kçÀçíCççÇ vççnçÇ. SíkçÀCççjç®ç çÆcçUlç vççnçÇ, lçj lççÇ oÓj kçÀjCççjç kçáÀþÓvç çÆcçUCççj? 
`DçVçoçlçç mçáKççÇ YçJç` ³çç ³ççípçvçímççþçÇ Dççlcçnl³ççûçmlç kçáÀìábyççblççÇuç hçç®ç MççUkçÀjçÇ cçáuççb®ççÇ çÆvçJç[ Dççcnçuçç kçÀjç³ç®ççÇ nçílççÇ. nçÇ cçáuçí MççíOçlççvçç çÆJçoYçç&lçu³çç mççcçççÆpçkçÀ JççmlçJçç®çç GYçç kçÀçìsío hççnç³çuçç çÆcçUçuçç. ³çJçlçcççU çÆpçu¿ççlçu³çç JçíiçJçíiçUîçç iççJççbcçOçÓvç çÆHçÀjlççvçç Dççlcçnl³çç kçíÀuçíu³ççb®³çç kçáÀìábyççdzççbmçcççíj pçí ÒçMvç GYçí þçkçÀuçí Dççnílç, l³ççb®³çç çÆJççÆJçOç lçNnç hççnlçç Dççu³çç.

 

 


mçJçç&lç hççÆnuççÇ DççþJçlçí- Yççbyçjçpçç ³çç iççJççlççÇuç kçÀcçuççyççF& hççínvçkçÀj nçÇ cççÆnuçç. ³çç iççJççlççÇuç lççÇvç MçílçkçÀN³ççbvççÇ Dççlcçnl³çç kçíÀu³çç Dççnílç. SkçÀç IçjçÇ cçççÆnlççÇ Içílç yçmçuççí Dçmçlççvçç ³çç yççF& çÆlçLçí Dççu³çç. l³ççnçÇ cçççÆnlççÇ oíT uççiçu³çç. l³ççbvççÇ çÆJçvçblççÇ kçíÀuççÇ kçÀçÇ, DççcnçÇ l³ççb®³çç IçjçÇ ³çç³çuçç®ç nJçí. DçMççJçíUçÇ `vççnçÇ` cnCçç³çuçç DççcnçÇ mçjkçÀçjçÇ DççÆOçkçÀçjçÇ Lççí[í®ç nçílççí? l³çç yççF¥®³çç IçjçÇ içíuççí. kçÀcçuççyççF& l³ççb®ççÇ kçÀnçCççÇ mççbiçÓ uççiçu³çç… 
l³ççb®çí hçlççÇ kçábÀpççjçcç ³ççbvççÇ MçílççÇlç JççjbJççj ³çíCççN³çç Dçhç³çMççuçç kçÀbìçUÓvç 2003 mççuççÇ Dççlcçnl³çç kçíÀuççÇ. l³ççvçblçj çÆcçUçuçíuççÇ cçolç kçÀpç& HçíÀ[C³ççlç mçbhçÓvç içíuççÇ. lçjçÇnçÇ cçáuçiçç jçcçYççT DçççÆCç mçÓvç ³ççb®³çç DççOççjçvçí kçÀcçuççyççF& OççÇjçvçí Dççuçíu³çç hççÆjçÆmLçlççÇuçç mççcççíN³çç içíu³çç. hçjblçá çÆvç³çlççÇ®çç KçíU DçpçÓvçnçÇ yççkçÀçÇ nçílçç. jçcçYççTuçç kçÀçnçÇ cççÆnv³ççbhçÓJçça çÆhçmççUuçíuçç kçáÀ$çç ®ççJçuçç. FbpçíkçwMçvç I³ççJçí cnCçÓvç kçÀcçuççyççF& cçáuç箳çç cççiçí uççiçu³çç. hçCç l³ççvçí ®ççuç{kçÀuç kçíÀuççÇ. cççÆnv³ççYçjçlç®ç l³çç®ççÇ Òçkç=ÀlççÇ Kçbiçç³çuçç uççiçuççÇ. l³ççlç®ç l³çç®çç oáozJççÇ Dçblç Pççuçç. nkçÀvççkçÀ cç=l³çácçáKççÇ hç[uçíu³çç cçáuç箳çç cç=l³çÓvçí kçÀcçuççyççF¥®çç OççÇj Kç®çuçç Dççní. `mçÓvç kçÀç³ç kçÀjlçí?` Dçmçí çÆJç®ççju³ççJçj kçÀcçuççyççF& cnCççu³çç, `cçpçájçÇ kçÀjlçí. Dççcnçuçç pçiçJçlçí!` Dççlçç kçÀçíCççÇnçÇ DççÆOçkçÀçjçÇ, mçbmLççb®çí kçÀç³ç&kçÀlçx iççJççlç Dççuçí kçÀçÇ kçÀcçuççyççF& l³ççb®³çç hçç³ççJçj [çíkçíÀ þíJçÓvç cçolççÇ®ççÇ ³çç®çvçç kçÀjlççlç. l³ççb®³çç cçáuçç®çç cç=l³çÓ `MçílçkçÀjçÇ Dççlcçnl³çç` ³çç mçojçlç cççí[lç vçmçu³ççvçí MççmçkçÀçdzç cçolç çÆcçUCçí Mçkçw³ç vççnçÇ. hçCç kçÀçíCççÇlçjçÇ cçolç kçÀjíuç, ³çç DççMçíJçj l³çç çÆoJçmç kçÀç{lç Dççnílç. 
çÆJçoYçç&lç mçJçç&lç pççmlç Dççlcçnl³çç ³çJçlçcççU çÆpçu¿ççlç DçççÆCç l³ççlçnçÇ yççíLçyççí[Cç ³çç iççJççlç Pççu³çç Dççnílç. ³çç iççJççlç DççpçhççJçílççí 40 Dççlcçnl³çç Pççu³çç Dççnílç. iççJççlç oáhççj®³çç JçíUçÇ hççínçí®çuççí. Tvç cççÇ cnCçlç nçílçb. mçiçUçÇkçÀ[í Gpçç[ DçççÆCç YçkçÀçmç JççlççJçjCç. çÆvç©lmççnçÇ kçÀjCççjb. mçcççíj®ç hççvçhçfçÇ®ççÇ ìhçjçÇ. MçípççjçÇ cççlççÇ®³çç çEYçlççÇJçj lççlhçájlçí shhçj ìçkçÓÀvç lç³ççj kçíÀuçíu³çç pççiçílç kçÀçnçÇ cççCçmçí hçÊçí KçíUlç nçílççÇ. yççkçÀçÇ®çí l³ççb®çç KçíU hççnlç yçmçuçí nçílçí. DççcnçÇ l³ççb®³ççkçÀ[í pççTvç cçççÆnlççÇ çÆJç®ççª uççiçuççí, lçmçç l³ççlççÇuç SkçÀpçCç vççjçpççÇvçí®ç Gþuçç. yçnáOçç Dçmçí DçvçíkçÀpçCç l³çç iççJççlç cçççÆnlççÇ çÆJç®ççjç³çuçç ³çílç DçmçlççÇuç. ³çç iççJççlççÇuç p³çç JççIçcççjí kçáÀìábyççuçç DççcnçÇ Yçíìç³çuçç içíuççí nçílççí, l³ççhçÌkçÀçÇ kçÀçíCççÇ®ç IçjçÇ vçJnlçí. MçípççN³ççbvççÇ®ç l³ççb®³ççyçÎuç cçççÆnlççÇ çÆouççÇ. DççcnçÇ yçmçuççí nçílççí çÆlçLçí MçípççjçÇ®ç iççb[ÓUKçlçç®çç Kç·ç nçílçç. Jçj kçÀçíCçl³çç lçjçÇ ³ççípçvçí®³çç vççJçç®ççÇ hççìçÇ. Kç·îççlç iççb[ÓUnçÇ vçJnlçí DçççÆCç KçlçnçÇ. vçámçlçç®ç cççlççÇ®çç çÆ{iççjç. oáuç&çÆ#çlç. l³çç IçjçlçÓvç çÆvçIççuççí. iççJççlççÇuç kçÀçnçÇpçCç kçÀçnçÇyççnçÇ mççbiçlç Dççc箳çç mççíyçlç ³çílç nçílçí. Dç®ççvçkçÀ cççiçÓvç nçkçÀ DççuççÇ. 
`mççníyç Lççbyçç!` DççcnçÇ cççiçí JçUÓvç hçççÆnuçí. SkçÀ lç©Cç OççJçlç Dççc箳çç cççiçÓvç ³çílç nçílçç. pçJçU Dççu³ççJçj l³ççvçí l³çç®ççÇ DççíUKç kçÀªvç çÆouççÇ. l³çç®çí vççJç- uçnÓ hçjMçájçcç ®çJnçCç. MçílççÇ hçjJç[lç vççnçÇ cnCçÓvç lççí DçççÆCç l³çç®ççÇ yçç³çkçÀçí cçpçájçÇ kçÀjlççlç. uçnÓvçí çÆJç®ççjuçí, `Dççlcçnl³çç kçíÀuçíu³ççbmççþçÇ ³ççípçvçç Dççnílç. hçCç pçí çÆpçJçblçhçCççÇ cçªvç jççÆnuçí Dççnílç, l³ççb®³ççmççþçÇ kçÀçnçÇ®ç ³ççípçvçç vççnçÇlç kçÀç?` ³çç DçvçhçíçÆ#çlç ÒçMvççvçí Dççcnçuçç çÆvç©Êçj kçíÀuçí DçççÆCç Dçblçcçá&KçnçÇ! cçvççlç Dççuçí- ³ççípçvçç Dççnílç®ç kçÀçÇ! vçákçÀlççÇ®ç DççcnçÇ hçççÆnuçíuççÇ iççb[áUKçlç ³ççípçvçç, pçuçmJçjçp³ç ³ççípçvçç, jçípçiççj ncççÇ ³ççípçvçç, ûççcççÇCç çÆvçjçOççj ³ççípçvçç… FbçÆojç iççbOççÇ, jçpççÇJç iççbOççÇ, vçínª ³çç mçJç祮³çç vççJççvçí içjçÇyççb®çç çÆJçkçÀçmç kçÀjCççN³çç ³ççípçvçç DççhçCç vçíncççÇ®ç vçíl³ççb®³çç Yçç<çCççlç SíkçÀlççí. ³ççuçç ³çç ³ççípçvçç cççnçÇlç vççnçÇlç? kçÀçÇ kçÀçíCççÇ ³ç箳ççhç³ç¥lç l³çç hççínçí®çJçu³çç®ç vççnçÇlç? 
uçnÓ®³çç IçjçÇ içíuççí. Içj kçÀmçuçí, uçnçvç Pççíhç[çÇ®ç nçílççÇ lççÇ. yççníj SkçÀç uççkçÀ[çÇ yççpçíJçj SkçÀ hçVççMççÇ®ççÇ cççÆnuçç PççíhçuçíuççÇ. çÆl箳çç nçlççuçç mçuççF&vç. mçuççF&vç®çí êçJçCç mçbhçuçíuçí. vçámçlççÇ®ç mçáF& nçlççuçç ìçí®çÓvç þíJçuçíuççÇ. nçÇ uçnÓ®ççÇ DççF&. çÆlç®ççÇ oçívnçÇ cçÓ$ççEhç[í çÆvçkçÀçcççÇ PççuççÇ Dçmçu³ççvçí ®çínN³ççuçç mçÓpç DççuççÇ nçílççÇ. [ç@kçwìjçbvççÇ mçJç& Ghçç³ç mçbhçu³çç®çí mççbiçÓvç ìçkçÀuçí Dççní. pçiçíuç çÆlçlçkçíÀ çÆoJçmç pçiçíuç. `DççF&uçç pçcçíuç lçmçí pçiçJçlççí Dççní,` uçnÓvçí mççbçÆiçlçuçí. oççÆjêîçjí<çíKççuççÇuç kçáÀìábyç DçmçÓvçnçÇ l³çç®çí jíMçvçkçÀç[& yçbo Dççní. cnCçpçí l³ççJçj Oççv³ç çÆcçUlç vççnçÇ. uçnÓuçç pçcçíuç lççÇ cçolç kçÀjç³ç®çí þjJçÓvç DççcnçÇ çÆlçLçÓvç çÆvçIççuççí. 
yççYçÓUiççJç lççuçákçw³ççlççÇuç hçnÓj iççJç yçWyçUç OçjCç ÒçkçÀuhççlç hççC³ççKççuççÇ pççCççj Dççní. hçávçJç&mçvçç®ççÇ MççmçkçÀçÇ³ç ³ççípçvçç kçíÀJnç®ç mç᪠PççuççÇ Dççní. ³çç iççJççlççÇuç Dççlcçnl³çç kçíÀuçíu³çç ³ççíiççÇjçpç kçÀçíäçÇ ³ççb®³çç IçjçÇ DççcnçÇ çÆvçIççuççí nçílççí. jç$ççÇ®çí Dççþ Jççpçuçí nçílçí. iççJççlç uççí[MçíçE[içcçáUí DçbOççj. iççJççlçu³çç [ç@. yççyççmççníyç Dççbyçí[kçÀjçb®³çç hçálçUîççMçípççjçÇ kçÀçíäçR®çb Içj. iççJçkçÀN³ççbvççÇ Içj oçKçJçuçb. ³ççíiççÇjçpç kçÀçíäçÇ ³ççb®ççÇ hçnÓj iççJççlç®ç MçílççÇ nçílççÇ. hçnÓj iççJç OçjCçûçmlç cnCçÓvç pççnçÇj Pççu³ççJçj Òçl³çíkçÀ MçílçkçÀN³ççuçç pççÆcçvççÇ®çç cççíyçouçç çÆcçUçuçç. ³ççíiççÇjçpç kçÀçíäçÇ ³ççbvçç pççÆcçvççÇ®çç cççíyçouçç cnCçÓvç SkçÀ uççKç onç npççj ©hç³çí çÆcçUçuçí. l³ççbvççÇ lçí yçBkçíÀlç pçcçç kçíÀuçí. kçÀçnçÇ çÆoJçmççbvççÇ l³ççb®³çç uç#ççlç Dççuçí kçÀçÇ, DççOççÇ Içílçuçíu³çç kçÀpçç&®ççÇ hçjlçHçíÀ[ cnCçÓvç yçBkçíÀvçí lççÇ jkçwkçÀcç kçÀçhçÓvç IçílçuççÇ Dççní. Dççlçç kçÀmçç³çuçç pçcççÇvç vççnçÇ DçççÆCç YççÆJç<³ççmççþçÇ nçlççlç hçÌmçí vççnçÇlç. ³çç vççcçá<kçÀçÇhçç³ççÇ®ç ³ççíiççÇjçpç kçÀçíäçÇ ³ççbvççÇ kçÀçÇìkçÀvççMçkçÀ Içílçuçí DçççÆCç mJçlç:hçájlçç ÒçMvç mççí[Jçuçç. hçávçJç&mçvç箳çç çÆþkçÀçCççÇ kçÀçíäçÇ kçáÀìábyççuçç HçÀÊçÀ IçjçhçájlççÇ pçcççÇvç çÆcçUíuç. mçO³çç cçpçájçÇ kçÀªvç kçÀçíäçR®³çç çÆJçOçJçç hçlvççÇ hçç®çpçCççb®çí kçáÀìábyç ®ççuçJççÇlç Dççnílç. 
kçÀçíþçJçíCççÇ iççJççlççÇuç Dççlcçnl³ççûçmlç {çíuçí kçáÀìábyççuçç Yçíì Ðçç³çuçç içíuççí lççíJçj ®ççbiçuçç®ç DçbOççj hç[uçç nçílçç. ncçjml³ç箳çç MçípççjçÇuç ®çhhçuç oákçÀçvç jçpçÓ {çíuçí ³ççb®³çç YççJçç®çí çÆvçIççuçí. lççí oákçÀçvç mççí[Óvç ³çç³çuçç lç³ççj vçJnlçç. hçCç kçÀçnçÇyççnçÇ mççbiçÓvç l³ççuçç lç³ççj kçíÀu³ççJçj Dççc箳ççmççíyçlç Dççuçç. Içjçyççníj®³çç yçuyç®çç Gpçí[ hç[C³ççhçí#çç DçbOççjç®ççÇ®ç pççCççÇJç pççmlç nçílç nçílççÇ. Içjç®çç cççiç®çç Yççiç {çmçUuçíuçç. Içjç®çí yççbOçkçÀçcç DçOç&Jçì çÆmLçlççÇlç. jçpçÓ {çíuçí ³ççb®³çç hçlvççÇ p³ççílççÇ {çíuçí ³ççbvçç hçlççÇvçí Dççlcçnl³çç kçÀç kçíÀuççÇ Dçmçíuç, ³çç®çç kçÀçnçÇ®ç Dçboçpç vççnçÇ. l³ççb®çç cççíþç cçáuçiçç GcçíMç mçnçJççÇlç DçççÆCç OççkçÀìç cçbiçíMç ®ççÌLççÇlç çÆMçkçÀlççí Dççní. p³ççílççÇ {çíuçí JççÇmç ©hç³çí jçípççvçí cçpçájçÇ kçÀªvç Içj ®ççuçJçlççlç. Dççlcçnl³ççûçmlç kçáÀìábyç cnCçÓvç SkçÀ uççKç ©hç³çí l³ççbvçç cçbpçÓj Pççuçílç. l³ççhçÌkçÀçÇ lççÇmç npççj çÆcçUçuçílç. Gjuçíuçí mçÊçj npççj mççlç Jç<çç¥vççÇ çÆcçUCççj Dççnílç. çÆcçUçuçíuçí lççÇmç npççj ©hç³çí Kç®ç&nçÇ Pççuçí Dççnílç. p³ççílççÇ {çíuçí ³ççbvççÇ mççbçÆiçlçuçí kçÀçÇ, kçÀçnçÇ çÆkçÀjkçÀçíU Kç®ç& Pççuçç, kçÀçnçÇ Içj箳çç yççbOçkçÀçcççuçç uççiçuçí. l³ççlç}í lçíjç lçí hçbOçjç npççj ©hç³çí jçpçÓ {çíuçí ³ççb®³çç lçíjçJ³ç箳çç iççJçpçíJçCççmççþçÇ kçÀç{uçíuçí kçÀpç& HçíÀ[ç³çuçç Jççhçjuçí. SíkçÓÀvç OçkçwkçÀç®ç yçmçuçç. oçívç uçnçvç cçáuççb®³çç YççÆJçlçJ³çç®ççÇ pçyççyçoçjçÇ Dçmçlççvçç SJç{ç hçÌmçç lçíjçJ³ççmççþçÇ Kç®ç& kçÀjC³ççlç kçÀçíCçlçí MçnçCçhçCç nçílçí, lçí mçcçpçívçç. hçCç nç®ç FLçuçç çÆjJççpç Dççní. iççJçpçíJçCç Iççlçuçí vççnçÇ lçj vççlçíJççF&kçÀ, iççJççlçuçí uççíkçÀ oÓ<çCçí oílç jçnlççlç. 
çÆJçoYçç&lç MçílçkçÀN³ççb®ççÇ Dççlcçnl³çç nçÇ®ç Dççlççhç³ç¥lç®ççÇ mçJçç&lç cççíþçÇ mçcçm³çç cççvçuççÇ pççlç nçílççÇ. hçCç Dççlçç l³ç箳çç pççí[çÇvçí®ç GIç[îççJçj hç[uçíu³çç çÆvçjçOççj kçáÀìábyççdzççb®çínçÇ ÒçMvç mçcççíj ³çílç Dççnílç. ³ççuçç mçJçç&lç pççmlç yçUçÇ hç[lç Dççnílç- l³çç IçjçblççÇuç çÆm$ç³çç. oçYçç cççvçkçÀj ³çç iççJççlççÇuç mççÇcçç cçç©lççÇ kçáÀUcçíLçí nçÇ l³çç®çí ÒçççÆlççÆvççÆOçkçÀ GoçnjCç Dççní. IçjçÇ içíu³ççJçj cçç©lççÇ kçáÀUcçíLçí ³ççb®³çç YççJççvçí nçÆkçÀkçÀlç mççbçÆiçlçuççÇ. cçç©lççÇvçí pçÓvç 2006 cçO³çí Dççlcçnl³çç kçíÀuççÇ. l³ç箳çç cççiçí cçáuçiçç DçbkçáÀMç DçççÆCç cçáuçiççÇ mççÇcçç. DçbkçáÀMç MççUç mççí[Óvç KççpçiççÇ yçmçJçj kçÀb[kçwìj®çí kçÀçcç kçÀjlççí. mççÇcçç IçjçÇ®ç Dçmçlçí. çÆlç®çí uçivç Pççuçí nçílçí. hçCç vçJçjç oçª çÆhçTvç cççjPççí[ kçÀjlççí cnCçÓvç kçÀç[çÇcççí[ IçíTvç çÆlçuçç cççníjçÇ DççCçuççÇ. çÆlç®ççÇ DççF& kçÀçnçÇ Jç<çç¥hçÓJçça Içjçlç pçUÓvç cçjCç hççJçuççÇ. ³ççíiçç³ççíiç cnCçpçí çÆlç®ççÇ cççíþçÇ yçnçÇCçnçÇ mççmçjçÇ pçUÓvç cçíuççÇ nçílççÇ. cç=l³çÓ®³çç ³çç yççlçc³çç mççbiçlççvçç, SíkçÀlççvçç mçJç祮çí ®çínjí çÆvçç|JçkçÀçj! pçiçC³ççlçuçç Dççvçbo njJçuçç nçílçç. DçççÆCç cç=l³çÓ®çí oá:Kç lçjçÇ kçÀªvç çÆkçÀlççÇ kçÀçU kçÀjCççj? DçMçç YççJçnçÇvç cçvç:çÆmLçlççÇlççÇuç nçÇ cççCçmçí. MççmçkçÀçdzç çÆvç³çcççblç yçmçuçí vççnçÇ cnCçÓvç kçÀçÇ kçÀç³ç, kçáÀUcçíLçí kçáÀìábyççuçç cçolç çÆcçUçuçíuççÇ vççnçÇ. mççÇcçç®çí hçávnç uçivç kçÀjC³çç®çç çÆJç®ççj ®ççuçÓ Dççní. hçávnç oçª[ç vçJçjç çÆcçUçuçç lçj? l³ççvçínçÇ cççjnçCç kçíÀuççÇ lçj? ³çç Dççc箳çç ÒçMvççuçç `vçMççÇyç çÆlç®çí!` Dçmçí GÊçj çÆcçUçuçí. çÆpçLçí Dçç³çá<³ççlçu³çç kçÀçíCçl³çç®ç ÒçMvççuçç GÊçjí mççhç[lç vççnçÇlç, çÆlçLçí DçMçç uçnçvçmçnçvç ÒçMvççbvçç GÊçjí çÆcçUC³çç®ççÇ DççMçç mçJçç¥vççÇ kçíÀJnç®ç mççí[uççÇ Dççní. kçÀçíþçJçíCççÇlççÇuç p³ççílççÇ {çíuçí, kçÀçíUPçjçÇlççÇuç sç³çç jçþçí[, kçÀcçuççyççF& hççínvçkçÀj ³ççb®³ççmççjK³çç lççÇvç lçí mçç[ílççÇvç npççj çÆJçOçJççb®çç ÒçMvç Dççpç SíjCççÇJçj Dçç}íuçç Dççní. MçílçkçÀN³ççJçj®ç mçJç&mJççÇ DçJçuçbyçÓvç DçmçCççN³çç l³ççb®³çç çÆJçOçJçç DçççÆCç IçjçlççÇuç cçáuççÇ ³ççbvçç Dççlçç kçÀçíCççÇnçÇ JççuççÇ vççnçÇ. DçuhççÆMççÆ#çlç Dçmçuçíu³çç ³çç cççÆnuççb®³çç ³ççíi³ç Jç mçvcççvçhçÓJç&kçÀ hçávçJç&mçvççmççþçÇ Òç³çlvç nçíC³çç®ççÇ çÆvçlççblç DççJçM³çkçÀlçç Dççní. MççmçvçojyççjçÇ Dççlcçnl³ççûçmlç kçáÀìábyççdzççbyçÎuç kçÀmçuççÇ®ç cçççÆnlççÇ GhçuçyOç vççnçÇ. kçíÀJçU Dççlcçnl³ççûçmlç kçáÀìábyççbvçç SkçÀ uççKç ©hç³çí oíTvç Mççmçvç Dççhçuçí nçlç PçìkçÓÀ hççnlç Dççní. çÆJçOçJççb®³çç mçcçm³ççbyçÎuç MççmçvçojyççjçÇ pçMççÇ DçvççmLçç Dççní, lçMççÇ®ç lççÇ mçcççpççlçnçÇ Dççní. ³çç 
mçJç& cççÆnuçç DçuhççÆMççÆ#çlç Dççnílç, ní uç#ççlç IçíTvç l³ççbvçç J³ççJçmçççÆ³çkçÀ ÒççÆMç#çCç oíTvç mJç³çbjçípçiççj箳çç cççO³çcççlçÓvç l³çç uçJçkçÀjçlç uçJçkçÀj mJççJçuçbyççÇ kçÀµçç yçvçlççÇuç, ní hççnCçí DççJçM³çkçÀ Dççní. çÆJçoYçç&lççÇuç MçílçkçÀjçÇ Dççlçç nUÓnUÓ hççÆjçÆmLçlççÇuçç mççcççíjí pççC³çç®ççÇ cççvççÆmçkçÀlçç yçvçJççÇlç Dççní. kç=À<ççÇ DççÆOçkçÀçN³ççbvççÇ mçá®ççÆJçuçíu³çç yçnájçä^çdzç kçÀbhçv³ççb®³çç cçnçiç[îçç DçççÆCç yçíYçjJçMç箳çç kçÀçhçÓmç çÆyç³ççC³ççbhçí#çç hççjbhççÆjkçÀ ncçKççmç hççÇkçÀ oíCççjçÇ çÆyç³ççCçí hçíjlç Dççnílç. kçíÀJçU kçÀhççMççÇJçj DçJçuçbyçÓvç vç jçnlçç mççí³ççyççÇvç, pJççjçÇ F. çÆhçkçÀçb®ççÇ uççiçJç[ kçÀjçÇlç Dççnílç. hçjblçá ní DçpçÓvçnçÇ J³ççÆÊçÀiçlç mlçjçJçj®ç Dççní. ³çççÆJç<ç³ççÇ kç=À<ççÇ çÆJçÐççhççÇþí, kç=À<ççÇ DççÆOçkçÀçjçÇ, ûççcççÆJçkçÀçmç箳çç #çí$ççlç kçÀç³ç& kçÀjCççN³çç mJç³çbmçíJççÇ mçbmLçç ³ççb®ççÇ DçvççmLçç oáozJççÇ Dççní. MçílçkçÀN³ççb®³çç Jçç{l³çç Dççlcçnl³çç, l³ççlçÓvç çÆvçcçç&Cç nçíCççjí ÒçMvç ní kçíÀJçU Mççmçvç, mçíJççYççJççÇ mçbmLçç ³ççb®³ççhçá{®çí DççJnçvç vçmçÓvç, 
lçí Yççjlççdzç mçcççpççhçá{®çí®ç DççJnçvç Dççní. 
çÆcççÆ}bo Dççjçí}kçÀj


प्रतिसाद

  1. सर हा लेख मी वाचू शकत नाही. दिसत नाही

  2. त्या सोबत लोकसत्ता ची लिंक दिली आहे. त्यावर पाहा. मिलिंद
    http://www.loksatta.com/daily/20070526/ch01.htm

  3. SADRUD LOKSHAHI HA LEKH WACHAL. KHUP KHUP CHHAN LEKH LIHILA HE TUMHI. VICHAR PURNAPANE MANALA PATLE.

  4. many thanks….Dhanyawad!

  5. atishay uttam aani upyukt mahiti dili aahet aapan sir

    Dhanyavad :)

  6. mala varil pratikriya Bangladesh ya topicvar dyaychi hoti pan tithe deta yet nahiye :(

  7. Many Thanks for your feedback. Milind

  8. mala majhya gavat matdar jagruti mohim pathnatya dvare rabvaychi aahe…
    please mala akhadya changlya pathnatya group badal sanga….
    thanks…..


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 66 other followers