Posted by: Milind Mohan Arolkar | नोव्हेंबर 7, 2009

Internet Activism – इन्टरनेटच्या माध्यमातून सामाजिक सक्रियता….

snapshotहा फोटो आहे भर सत्रात काढलेला…आश्लेषा हिंगे, मोहिनी, उमेश दिसत आहेत. इतर वर्गार्थी मागे आहेत. इन्टरनेटच्या माध्यमातून सामाजिक सक्रियता या याआधी कधीही न पाहिलेल्या शीर्षकाच्या २ दिवसीय शिबिराला शुल्क भरून २० जण उपस्थित होते. नाशिकच्या अतुल पाटणकर व प्रदीप पेशकार या दोन व्यावसायिक मित्रांनी त्यांच्या NGO तर्फे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहकार्याने हा वर्ग ६ व ७ नोव्हेंबरला आयोजित केला होता.

इंटरनेट तटस्थ, अलिप्त असे माध्यम आहे. त्याचा उपयोग कोण, कसा, आणि अशासाठी करतो ते महत्वाचे. TWITTER, FACEBOOK, BLOGS ही त्यावरची सामाजिक दृष्ट्या सक्रीय राहाण्याची उपकरणे, साधने आहेत. त्याचा, ज्याला जसा हवा, तसा उपयोग त्याने करावा. या साधनांची तोंडओळख करून देणे इतकेच माझे काम होते. ब्लॉग म्हणजे काय आणि ब्लॉग कसा तयार करावा व टिकवावा याबद्दल मी बोललो. ब्लॉगवरील पोस्ट लिहिण्याची प्रक्रिया कशी असते याचे प्रात्यक्षिक देताना मी माझ्या http://milindarolkar.wordpress.com/2009/04/13/एक-संवाद-राहुल-आणि-प्रिया/या पोस्टचा आधार घेतला.

मला स्वतःला आवडणारे अनेक ब्लॉग्ज सर्वांन ऑनलाईन दाखवले व त्यांची मला जाणवलेली वैशिष्ठ्ये सर्वांसोबत share केली. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग, शेतकरी आत्महत्यांचे महत्व जगाला ज्या ब्लॉगद्वारे पटवले गेले तो विदर्भ जन आंदोलन समितीचा http://andolan.blogspot.com/हा ब्लॉग. हे दोन ब्लॉग सुरूवातीला सर्वांना दाखवले. माझ्या आधीच्या सत्रात ब्लॉग, फेसबुक, ट्वीटर हे केवळ मनोरंजन, वैचारिक लढ्यातील शस्त्र की स्वांतसुखाय….अशी चर्चा झाल्याचे कोणितरी सांगितले. मला वाटते की माध्यमाचा उपयोग वापरणा-यावर असतो. म्हणजे एखादी सनई आहे. ती स्वतः जवळ असून उपयोग नाही. त्यात हवा फुंकली गेली तरच ती स्वरमाधुर्य देईल. म्हणजे सनईला वादक हवा. कर्ता असल्याशिवाय कर्म कसे होईल?…….कर्म….

महेंद्र कुलकर्णी यांचा ब्लॉग http://kayvatelte.wordpress.com/ एक आदर्श ब्लॉग म्हणून दाखवला. कुलकर्णी यांचा लेखनाचा झपाटा आणि passion मला फार भावलीय. निवेदिता बर्वे यांच्या नितांतसुंदर टिंबकथांचा मला स्वतःला आवडणारा ब्लॉग  http://kachakavadya.wordpress.com/,  सोनल वायकूळ यांचा http://sonalwaikul.wordpress.com हा ललित लेखांचा ब्लॉग. उत्कृष्ट कवितांचा http://dilkhulas.wordpress.com/ हा अनिकेत दाते यांचा ब्लॉग. http://manatale.wordpress.com/ – डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा हा एक वैविध्यपूर्ण विषयांना हाताळणारा ब्लॉग. यावरचं मला आवडणारं पान म्हणजे सायकल.

हे सर्वच ब्लॉग सहज, अभिनिवेशहीन वृत्तीने लिहिलेले. समकालीन विषयांवर, आपल्या छंदांवर, समाजातील विसंवादावर भाष्य करणारे हे ब्लॉगर्स!  सर्व आता celebrity बनलेत. कारण मी आतापर्यंत या विषयावर तीन वेगवेगळ्या ग्रूप्स समोर हा विषय मांडलाय. या सर्व ठिकाणी मी वरील ब्लॉग्ज शिबिरार्थींना दाखवतो आहे.

इराणमध्ये झालेल्या twitter revolution नंतर या माध्यमाच्या ताकदीबद्दलंचं गांभीर्य जगाला कळंलंय. आपल्या देशात इंटरनेटकडे तुच्छतेने पाहाणारेच अनेक. त्यामुळे जाणून घेऊन वापर करणं तर फार दूरची गोष्ट. मला वाटतं चांगलं कार्य करणा-या, समाजात चांगले विचार रूजविणा-या व्यक्ती व संघटना खूप आहेत. पण ते या माध्यमाच्या सामर्थ्याशी जाणते अजाणतेपणी अनभिज्ञ आहेत. त्यांची सक्रियता इंटरनेटवरही वाढायला हवी. कारण त्यांचे विचार, कार्य समजण्याची समाजाला गरज आहे.

याचे महत्व ओळ्खून हे विषय समाजाच्या गळी उतरविण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातील वेळ खर्च करून हा कार्यक्रम आयोजित करणारे अतुल पाटणकर आणि प्रदीप पेशकार यांच्या सारख्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.


प्रतिसाद

  1. Just as a proof that we learned a lot, I am visiting this page to express my appreciation of your very useful and practical session.

    Hope by the end of the day I will also create a of my own Will let you know.

  2. Dear Atul….I take this comment as feedback to my session and not as appreciation. Thanks.

  3. कर्ता असल्याशिवाय कर्म कसे होईल?……………..khup khup chan watale…………Actually the session was extraordinary ….rather it was very very practical……..( not only bhappegiri) more than that I liked ur promptness of writing ur comment regarding it very punctually ….we have to become skilled in it

  4. इंटरनेटशी माझा परिचयही अशाच एका शिबीरातून झाला होता. नंतर ब्लॉगींगची आवड निर्माण झाली. आपल्याकडे इंटरनेट बाबत अजूनही उदासिनता आहे. तुम्ही घेत असलेल्या शिबीरांमुळे लोकांना इंटरनेट व ब्लॉगिंगचं महत्त्व नक्कीच पटेल.

  5. मिलिंद
    इतका मान दिल्या बद्दल मनःपुर्वक आभार. आणि तुमच्या उपक्रमासाठी शुभेच्छा. दुपारी ऑफिस मधे असल्याने हा लेख वाचता आला नाही. पण घरी आल्यावर आधी वाचला आणि आवडला.

  6. महेंद्रजी…आपण समकालीन ब्लॉगर्स चे IDOL आहात असे माझे मत आहे. आपल्या ब्लॉगवरील विषयांचे वैविध्य आणि लेखनाचा झपाटा याचे मला अप्रूप वाटते. एखाद्या अशा शिबिरात आपल्याला पाहुणे वक्ता म्हणून आमंत्रित करावे अशी माझी इच्छा आहे कारण अनेकदा नुसते भाषण बाजी करणारे व प्रत्यक्षात ब्लॉगिंग न करणारे लोक तिथे वक्ता म्हणून जाऊन शिबिरार्थींना उल्लू बनवतात. हा विषय practical आहे, Theoretical नक्की नाही.

  7. धन्यवाद कांचनजी…!

  8. माझ्या नाशिकच्या शिबिरातील सत्रानंतरचा निर्माण झालेला पहिला ब्लॉग
    http://atulpatankar.wordpress.com

  9. Milind,
    Thanks a lot for the generous mention of my blog in your talk. It is an honour for me and my writing.
    I like this article too, it covers a lot of aspects of the internet and its implications in a very comprehensive manner. Best wishes for your future undertakings.

  10. ब्लॉग हा एखाद्या लहान मुलासारखा असतो. त्याची हेळसांड करुन चालत नाही. जर ब्लॉग ला रेग्युलर फिडींग कराल, तरंच ब्लॉग जगेल.

    ब्लॉग वर नियमीत लेखन असणे आवश्यक आहे. बरेच लोकं दररोज तुमचा ब्लॉग चेक करतात, तुम्ही कांही लिहिलं का ते पहायला.. जर त्यांना नविन कांही मिळालं नाही, तर ते पुन्हा येणार नाहीत ही गोष्ट कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    अर्थात, ब्लॉग वर लिहायला विषय लागतोच. बरेचदा मी पण फ्रस्ट्रेट होतो- विषय मिळाला नाही की.. पण आजपर्यंत तरी फार कमी वेळा असं झालंय, की काय लिहावं हे विषय नसल्यामुळे समजलं नाही.पण जर.. असं झालंच तर मात्र वैताग येतो नुसता… :)

  11. Thnaks Nivedita,
    I like your टिम्ब कथा too much. The participants also liked too much. Actual after watchin u r blog, they (and myself too) got an idea of how to enrich their thoughts through their BLOG.
    माझ्या नाशिकच्या शिबिरातील सत्रानंतरचा निर्माण झालेला पहिला ब्लॉग. pl read and comment if possible-
    http://atulpatankar.wordpress.com
    - Milind

  12. AshleShaa, namaskaar, thanks fr feedback.
    I like to share the little-bit i know, with everyone around me…Milind

  13. Milindji
    majhya chhotyasha prayatnachi itaki mothi dakhal ghetalyabaddal khup khup aabhar.
    Sanai chi upama khup aawadali.
    Blog hi sankalpana ajun eka karana sathi mala aawadate, ti mhanje wyakt hone. aaj ‘sanwad’ aani ‘manase’ hya donhi goshtinpaasun navin pidhi durawat astana, manatalya bhavna wyakt karayla he ek madhyam asan khup mahtwach aahe. samajik swasthyachya drushtine navin pidhichya bahvnancha nichara hon he aawshyak aahe aani kahi pramanat blogs tyala haatbhar laawat aahet.
    punha ekda manapasun aabhar maante.

  14. आभार कसले? आपल्या व आपल्यासारख्या इतर ब्लॉगर्सच्या ब्लॉगमुळे काही नवीन लिहिणा-यांना, स्वतःला व्यक्त करू पाहाणा-यांना प्रेरणा व दिशा मिळाली, हे महत्वाचे!

  15. Namskar,
    ya satramadhe prathamch Blog vishai khup chan mahiti milali. apan dilelya vegvegalya blogvar jaun mahiti ghet aahe. Lavkarch eka vegalya vishyavar Blog tayar karnycha prayatna karat aahe.

    Thanks for very useful guidance,

    Uma

  16. तुमच्या चांगल्या प्रयत्न बद्दल अभिनंदन.

  17. मनःपूर्वक धन्यवाद रवींद्रजी…!

  18. श्री. मिलींदजी, सोनल च्या नुकत्याच झालेल्या ओळखीतून, तिच्या ब्लॉग वरून मी इथे उड्डाण करून आलॊ,व तुमच्या ह्या लेखाच्या प्रेमात पडलो.
    माझे सध्या दोन ब्लॉग कसेतरी अस्तित्वात आहेत !
    पहिला
    http://sureshpethe.blogspot.com/
    हा आहे माझ्या कवितांचा. अर्थात ऑगस्ट पासून एकही कविता न सुचल्याने तो मागे राहिला, पण सुचणे न सुचण्या वरच तो अवलंबून रहाणार आहे त्याला इलाज नाही.

    दुसरा,

    http://sketching-bysureshpethe.blogspot.com/
    हा स्केचिंग वर आधारित ब्लॉग केला खरा पण नंतर माझ्या ऑर्कुट वरील अल्बम मध्ये गेले वर्षभर मि रोज एक चित्र टाकीत आलॊ आहे त्यामुळॆ हा ब्लॉग तूर्त मागे पडला आहे व तो मी १ जाने २००९ पासून एखाद्या नव्या स्वरूपात आणण्याचे योजित आहे.

    कल्पना अशी आहे की साधारण प्रत्येक आठवड्याला माझे एक नविन स्केच अथवा चित्र व त्या अनुषंगाने काही तरी माहीती पूर्ण लिखाण फोटॊ किवा विडीयो क्लिप असे काही तरी एका पृष्ठावर मावेल असे द्यायचे.

    अजून १ महिना आहे त्यामुळे आपणास काही सुचत असेल तर जरूर सांगावे. माझे अल्बम जरूर पहावेत. मी sureshpethe नावाने ऑर्कुट वर असतो..

    आपला व येथिल सर्वांचा मोलाचा सल्ला मला हवा आहे.

    आपला,

    सुरेश पेठे

  19. नमस्कार ,
    श्री. मिलिंदजी ,आपला लेख फ़ार आवडला. पेठे काकांच्या blog वरुन मला आपला पत्ता कळला. आपण नोंदविलेला व आपण चालवलेला हे दोन्ही उपक्रम छान आहेत .

  20. मनः पूर्वक धन्यवाद!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 66 other followers