मनोहर पर्रिकर : आठवणीचा कोलाज – भाग 1

मनोहर पर्रिकर : काही क्षणचित्रे-1

स्थान : जुने विधान भवन पणजी (मांडवी नदी काठचे)
वेळ: दुपारी 12.30
औचित्य : अभाविप आंदोलन संदर्भात भेट

गोव्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्टायपेंड संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक उग्र आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभावीप कार्यकर्त्यांना स्वतंत्र चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले ती माझी व मनोहर पर्रिकर यांची पहिली भेट. 2001-2002 च्या काळातील ही घटना.

आंदोलनाची उग्रता वागवत, विद्यार्थी हितासाठी हितसंबंधांचा विचार व करता सरकार विरोधी भूमिका सहजपणे मिरवणारे त्याकाळातील आम्ही सर्व कार्यकर्ते आणि त्यांचा संघटनमंत्री या नात्याने त्याच अतिनिर्भीड पणे मी विषयाची मांडणी केली. सरकारने विद्यार्थिहिताची भूमिका घेण्यात कशी कुचराई केली आहे हे मांडताना त्या काळातील परिषद कार्यकर्त्यामध्ये असणारा अति आक्रमकपणा माझ्या बोलण्यात आला असावा.

पर्रिकर थोडे मनात रागावले ही असतील. त्यांनी दालनात उपस्थित असलेल्या भाजपाच्या एका प्रमुख कार्यकर्त्याला विचारले – हो कोण? – ABVP चो नवो प्रचारक! त्यांना उत्तर मिळाले. मी विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे हे कळल्यावर पर्रिकरांमधील पालक कार्यकर्ता जागा झाला बहुधा ! चर्चा सुरू असतानाच माझी विचारपूस केली… मुळचा कुठला… गोव्यात कधी आलास.. आधी का भेटला नाहीस… घरी जेवायला कधी येतोस…राहायची व्यवस्था कुठे .. इ.. आत्मियतेने चौकशी झाल्यावर मग परत आमची मूळ विषयावर चर्चा सुरू झाली.

…..अगदी आक्रमक पणे आम्ही सर्वजण आमचे विषय मांडत होतो. खरे म्हणजे पर्रिकरांना त्याची सवय नसावी. भाजप जाऊदे… विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याची टाप …..नव्हती पर्रिकरांसोबत आगाऊ वाद घालण्याची. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि स्मरणशक्तीच्या जोरावर ते कोणत्याही फाईलमधील दाखले सहजपणे देऊन विरोधकाचे तोंड बंद करू शकत होते.

पण त्यांच्या दालनात होते ते कोणतेही राजकीय स्वप्न न पडलेले आम्ही कार्यकर्ते आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे बुद्धिवान विद्यार्थी! सर्वांनी पर्रिकरांना प्रश्नांच्या सरबत्तीने अगदी बेजार करून सोडले असावे. ज्यांचे प्रश्न होते त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कशा होऊ शकतात याचा एक अभ्यासपूर्ण आराखडाच आम्ही मांडला होता, ती फाइल आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. लक्षात आले की चर्चेच्या सुरुवातीला आमच्या आगाऊ प्रश्नाच्या सरबत्तीने थोडेसे डिवचले गेलेले पर्रिकर आमच्या मुद्द्यांमध्ये रस घेऊ लागले. आमच्यामध्ये वास्को येथे राहणारी एक विद्यार्थिनी अत्यंत उत्तमा रीतीने मुद्दे मांडत होती. तिच्या त्या आवेशाने प्रभावित होऊन पर्रिकरांनी तिचे नाव आणि कुठे राहते ते विचारले. आणि भाजप कार्यकर्त्याला म्हणाले- आपल्याला वास्को मध्ये ही चांगली कार्यकर्ती मिळाली!

आम्ही ज्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री पर्रिकरांना भेटलो होतो, तो प्रश्न अखेर सुटला. पर्रिकरांनी अत्यंत खुल्या मनाने कौतुक केले ते आमच्या (आगाऊ) आक्रमकपणाचे, आमच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे… आमच्या भीडभाड न ठेवता ठामपणे विद्यार्थिहिताचे विषय मांडण्याचे !

आता ही घटना आठवताना असे लक्षात येते की त्यांच्या जागी एखादा खुज्या व्यक्तिमत्वाचा अहंकारी राजकारणी असता तर .. प्रश्न सुटणे दूर .. एक कायमचे वितुष्ट सरकार व विद्यार्थी संघटनेत निर्माण झाले असते. पर्रिकर उमदे होते, गुणग्राहक होते…समाज नक्की कसा आहे .. त्याचे प्रश्न काय आणि त्याला उत्तरे कोणती याची स्वाभाविक जाण त्यांना होती.

आज लक्षात राहातात ते ठामपणे आपले प्रश्न मांडणार्‍या कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे नेते पाहाणारे पर्रिकर !…

Advertisements

Published by Milind Mohan Arolkar

Web Journalist - Voluntarily worked in the social field for several years. Currently in web journalism field. Passion for expression is the motivation behind my writing. 'Nation first' theme of my life!

One thought on “मनोहर पर्रिकर : आठवणीचा कोलाज – भाग 1

  1. पर्रीकर सरांच्या विषयी चा पहिला lekh फेसबुक वर शेअर केलाय… अटलजी आणि पर्रीकर सर ह्या दोघांच्या मृत्यू वेळी कधी नव्हे ते डोळे भरून आले… एरवी राजकारणी लोक हा शिव्या द्यायचा विषय असतो, पण पर्रिकरांनी आताच्या पिढीला राजकारणाची एक नवीनच ओळख करून दिली… त्यांचं Augusta Westland प्रकारणावरच चर्चा आणि उत्तर technical भाषणाचा उत्तम नमुना आहे…

    असा राजकारणी पुन्हा होणे नाही..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: